आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना मैदानी खेळापासून रोखून पालकच करताहेत पाल्यांचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासात अभ्यासाला महत्त्व आहेच, तितकेच महत्त्व मैदानी खेळालादेखील आहे. खेळामुळे मन आणि शरीर दोन्ही चांगले राहते. परंतु, बहुतांश पालकांना याची समज नसते. आपल्या पाल्याने केवळ अभ्यास करावा, असे त्यांना वाटते. मैदानी खेळाला पालकांचीच नापसंती असते. त्यामुळे अनेक मुलांना आवड असूनही खेळ अथवा क्रीडा प्रकारात सहभागी होता येत नाही. यामुळे बालपण हिरावून घेतले जाते. बागडण्याच्या वयात पालकांच्या हस्तक्षेपामुळे मुलांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो.
काही शाळांनी विविध क्रीडा प्रकार सक्तीचे केले आहेत. त्यामुळे मुलांना सकाळी सहा वाजता शाळेत यावे लागते. यावर काही पालकांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. पाल्य अनफिट असल्याचे दाखवून क्रीडा प्रकारातून सुटका करून घेण्याची पळवाट ते अवलंबत आहेत. सकाळी पोहण्यासाठी बाेलवण्यात आलेले असेल तर पालक हे पाल्याला न्यूमोनिया तसेच थंड पाण्याची अॅलर्जी, सर्दी, खोकला आदी असल्याची कारणे दाखवतात. ओळखीच्या डॉक्टरांकडून क्रीडा प्रकारासाठी अपात्र असल्याचे प्रमाणपत्र घेतले जात आहे. असे करून संबंधित डाॅक्टर आणि पालक हे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान करत आहेत.

पालकांमध्येच आहे अज्ञान
साधारणपणे आऊट डोअर अन् इनडोअर मिळून खेळाचे ७९ प्रकार आहेत. विद्यार्थी अापल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन करिअर घडवू शकतो. परंतु बहुतांश पालकांमध्ये क्रीडा प्रकारांविषयी कमालीचे अज्ञान आहे. अभ्यास केल्यानेच करिअर घडते, अशी त्यांची मनोधारणा आहे. त्यामुळे मैदानी खेळांविषयी पालकांचे प्रबोधन करणे आवश्यक बनले आहे. बऱ्याच वेळा पाल्य क्रीडा प्रकारांत सहभागी होऊ नये यासाठी पालक प्रयत्नशील असतात. पाल्यांना खेळापासून वंचित ठेवतात. विविध परीक्षा, ट्यूशनला पाठवण्याचा सपाटा लावतात. विद्यार्थी सतत अभ्यासातच गुंतून राहावा, असा पालकांचा अाग्रह असतो. परिणामी, विद्यार्थी हे मैदानी क्रीडा प्रकारापासून दूर जात आहेत.

अंगाला माती लागू नये अशी मानसिकता
राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू नीता येरमाळकर म्हणाल्या, ""अंगाला माती लागणारे खेळच आवडतील, अशी सध्याच्या मुलांची मानसिकता तयार झाली आहे. बरेच पालकही माती लागेल, दुखापत होईल या भीतीने खेळण्याचा सल्ला देतात. ट्यूशन, सुरक्षितता, खेळाविषयी अज्ञान यामुळे पालक पाल्यांना खेळापासून वंचित ठेवतात. वी १० वीचे विद्यार्थी खेळात सहभागी होतात. तेही गुण िमळतात म्हणून. यासाठी विविध क्रीडा प्रकारांविषयी जागृती करावी लागणार आहे.''

गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, ""क्रीडा प्रकाराविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मैदानावर जास्त वेळ द्यावा. यामुळे शारीरिक वाढ चांगली होईल.''

पालक आपल्या बालकांना मैदानावर पाठवत नाहीत. मुले टीव्ही, मोबाइल आणि लॅपटॉपवर कार्टून मालिका, व्हीडिओ गेम आदी खेळण्यात गुंग होतात. परिणामी मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. अारोग्यावर विपरीत परिणाम होतो.

सकाळच्या कोवळ्या उन्हात मैदानी खेळ खेळल्याने बालकांमध्ये डी जीवनसत्त्व िनर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात. रोज व्यायाम केल्याने पचनक्रिया, शारीरिक वाढ होण्यास मदत होते.

मैदानी खेळांचे एक वेगळे महत्त्व असते. मैदानी खेळांपेक्षा लॉनटेनिस, बॅडमिंटन तसेच कमीत कमी कष्टाचे खेळ खेळण्यावर भर देण्याचा ट्रेंड उच्च मध्यमवर्गीयांत वाढत आहे. तो पाल्यांचा हिताचा नाही, हे समजून घेतले पाहिजे.

खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. आयुर्मान वाढते. िखलाडूवृत्ती आणि सांघिक भावना विकसित होते. हार आणि यश सहजपणे पचवण्याची मानसिकता बनते. सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.
विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. यासाठी शाळांनी चांगल्या सोयीसुविधा निर्माण केल्या पाहिजेत. मैदाने अधिक चांगली बनवली पाहिजे. क्रीडा साहित्य सहज उपलब्ध होतील याकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

पाल्याची अतिकाळजी घेण्याचा प्रकार अनेक पालकांमध्ये बळावत आहे. खेळताना थोडे जरी खरचटले तरी पालकांचा जीव कासावीस होतो. अशा अनाठायी काळजीमुळेच मुले मैदानापासून दूर जात आहेत.

व्यायाम, खेळाचे महत्त्व प्रभावीपणे समाजासमोर मांडण्याची गरज आहे. यासाठी रेडिओ, टीव्हीवर आकर्षक जाहिराती प्रसारित करून प्रबोधन करणे शक्य आहे. क्रीडाप्रेमी आणि शासकीय यंत्रणेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

मी रोज मैदानावर एक तास खेळण्यासाठी जातो. त्यामुळे अभ्यासामुळे आलेला आळस, ताण कमी होतो. पुन्हा अभ्यास करण्यासाठी चांगली स्फूर्ती िमळते. अारोग्य चांगले राहण्यास मदत होते. सुभाशिषजोजारे, विद्यार्थी,सुवर्ण स्पोर्ट अकॅडमी

शाळेत मला खेळायला आवडते. अभ्यास जास्त असल्यामुळे खेळासाठी वेळ देता येत नाही. होमवर्कही खूप असतो. वेळ िमळाला तर व्हीडिओ गेम खेळत बसतो. अभिजितकसबे, विद्यार्थी
पालक, पाल्य म्हणतात...

^खेळामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होतो. खेळापासून वंचित ठेवले तर त्यांचा सर्वांगीण विकास खुंटतो. माझ्या मुली खेळात सहभागी व्हावेत, यासाठी मी नेहमीच प्रोत्साहन देतो. प्रा.शिवराज पाटील, पालक

व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
^मैदानी खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी शाळा, संस्था आणि क्रीडा कार्यालयांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी शाळेत क्रीडा प्रकारात सहभाग घेणे सक्तीचे करणे गरजेचे आहे. क्रीडा प्रकारात करिअर करायचे असेल तर बालपणापासून खेळाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. खेळामुळे हार-जीत या गोष्टीची जाणीव होते. त्यामुळे विद्यार्थी जीवनात खचून जाता यशस्वीपणे वाटचाल करतील. खेळाडूंना करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. शाळांनी क्रीडा शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. समाजाने क्रीडा क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टिकोनाने पाहणे गरजेचे आहे. योगेशकुमारइंडी, एमआयटी,क्रीडा विभागप्रमुख

मुलांना प्रेरणा देण्यासाठी पालकांनीही करावा व्यायाम
^स्पर्धा वाढली आहे. आपले पाल्य प्रथम आले पाहिजे, अशी पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे पालक खेळाकडे दुर्लक्ष करायला भाग पाडतात. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व माहीत नसल्याने असे घडते. विद्यार्थ्यांना मैदानी खेळाकडे वळवण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. मुलांना प्रेरणा देण्यासाठी पालकांनीदेखील व्यायाम करणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार करिअर निवडू दिले पाहिजे. यासाठी पालकांची मन:स्थिती बदलणे गरजेचे आहे. खेळामुळे मन:स्थिती चांगली राहण्यास मदत होते. डॉक्टरांनी विनाकारण अनफिट सर्टिफिकेट देऊ नयेत. उलट पालकांचे प्रबोधन करून खेळ खेळण्याचा सल्ला द्यावा. नजीरशेख, मनपाक्रीडाधिकारी
शरीर फिट असेल तर मेंदूही चांगला आणि तल्लख राहतो

^ज्याशाळेत क्रीडाप्रकार अनिवार्य आहेत, अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे पालक खेळातून सूट कशी मिळेल याकडे जास्त लक्ष देतात. अनेक प्रकारची कारणे दाखवत पाल्य अनफिट आहे हे दाखवण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेतात. यामुळे मुलांना इच्छा असूनही क्रीडा प्रकारात सहभागी होता येत नाही. त्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार जडू शकतात. आयुष्य निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा चांगला उपाय आहे. खेळातही सध्या चांगल्या संधी आहेत. त्यामुळे अभ्यास केल्यानेच नोकरी मिळते हे समीकरण चुकीचे आहे. इतर गोष्टींतूनही पोट भरता येते. शरीर चांगले फिट असेल तर मेंदूही चांगला राहतो. व्यायामाने आयुर्मान वाढते. डॉ.दत्तप्रसन्न काटीकर, न्यूरोसर्जन

डाॅक्टरांनी करावे संबंधित पालकांचे प्रबोधन
^क्रीडा प्रकार हे स्वखुशीने खेळण्याचे प्रकार आहेत. त्यामुळे मुलांवर कोणताही खेळ जबरदस्तीने लादू नयेत. इच्छेनुसार त्यांना आवडीच्या खेळात सहभाग घेता आला पाहिजे. मैदानी खेळामुळे वेळ वाया जात नाही, उलट अभ्यास करण्यासाठी एनर्जी मिळते. त्यामुळे पालकांनी मुलांना खेळापासून वंचित ठेवू नये. रोज किमान एक तास तरी मैदानावर खेळले पाहिजे. अभ्यासाबरोबर शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे. त्यामुळे पालकांनी मैदानी खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. यासाठी डॉक्टरांनीही संबंधित पालकांचे प्रबोधन करावे. मैदानी खेळ खेळण्यावर भर द्या, असे डाॅक्टरांनी पालकांना सांगावे. भाग्यश्री बिले, जिल्हाक्रीडाधिकारी

बातम्या आणखी आहेत...