आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहबाह्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दरवर्षी 60 हजार ते 43 हजार रुपये मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून शिष्यवृत्ती मिळणार आहे. याची रक्कम शहराच्या दर्जानुसार ४३ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत मिळणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च आहे. 
 
मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी ही योजना आहे. योजनेच्या लाभासाठी दहावी, बारावी, पदवी आणि पदविका परीक्षेत ६० टक्केपेक्षा अधिक गुण आवश्यक आहेत. दिव्यांगांना ही मर्यादा ५० टक्के आहे. शिष्यवृत्ती रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, असे समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागेश चौगुले यांनी सांगितले. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी mahaeschol.maharashtra.gov.in किंवा sjsa.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करता येईल. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्याशी संपर्क साधावा. swadhar.swsolapur@gmail.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी १६ मार्चपर्यंत अर्ज करावेत. 
 
अशी मिळणार रक्कम 
मुंबई,मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये भोजन भत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार तर निर्वाह भत्ता हजार रुपये असणार आहे. मध्यमशहर आणि वर्ग महापालिका क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये भोजन भत्ता २८ हजार, निवास भत्ता १५ हजार तर निर्वाह भत्ता हजार रुपये मिळणार आहे. 
 
उर्वरित ठिकाणी विद्यार्थ्यांना ४३ हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार तर निर्वाह भत्ता हजार रुपये मिळणार आहे. 

याशिवाय वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी हजार अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हजार रुपये शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...