आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी वाहतुकीसाठी संघटनांकडून दुप्पट दर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रिक्षा-बसचालक संघटनांनी विद्यार्थी वाहतूक भाड्यात दुपटीने वाढ सुचवली आहे. ती पालकांना परवडेल का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे तो प्रश्न संघटनांनीच उपस्थित केला. 
 
पोलिस आयुक्त जिल्हाधिकारी यांनी खडसावल्यानंतर विद्यार्थी वाहतूक रिक्षा-बसचालक संघटनांनी विद्यार्थी वाहतुकीच्या भाड्यासाठी नवे दर आखले. नव्या दरांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. मात्र, हे दर पालकांना परवडतील की नाही? या बाबत आतापासूनच साशंकता व्यक्त होत आहे. विद्यार्थी वाहतूक आता नियमानुसारच होईल. मात्र ती महागडी होणार आहे. 
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसांत नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केली. परिणामी स्कूलबस रिक्षा चालक संघटनांनी या विरोधात एक दिवसीय संप केला. पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला तो म्हणजे दरवाढीचा. त्यानुसार सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी वाहतूक, ऑटोरिक्षा स्कूलबस, चालक संयुक्त कृती समितीने नवे दर निश्चित केले आहेत. त्याला आता शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर हे दर आरटीओसमोर मांडले जातील. यानंतर हे नवे दर लागू केले जातील. 

विद्यार्थी संख्या घटल्याने दरवाढ 
^पोलिस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनुसार आम्ही वाहतुकीचे दर ठरवले आहेत. सोमवारी हे दर शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले जातील. यानंतर आरटीओकडे देखील सादर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा आल्याने नाईलाजाने दर वाढवावे लागत आहेत.” संतोषजाधव, अध्यक्ष, शिवप्रकाश विद्यार्थी] वाहतूक संघटना, सोलापूर 

पोलिस आयुक्तांनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील विद्यार्थी वाहतुकीकडे लक्ष दिले. आरटीओ वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी अतिरिक्त विद्यार्थी संख्या असलेल्या वाहनावर कारवाई सुरूच ठेवली आहे. सोलापूरसह अक्कलकोट, अकलूज येथेही कारवाई केली जात आहे.