आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीची विद्या सावळे रूपेरी पडद्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - शालेय जीवनापासूनच अभिनयाचा छंद जोपासलेल्या येथील विद्या सावळे या युवतीचा छोट्या रंगमंचापासून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर पोहोचला आहे. नाट्यकलावंत ते सिनेअभिनेत्री असा प्रवास करणारी विद्या "सुपर्ब प्लान' या मराठी चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. आजपासून हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. स्थानिक कलावंतांचा सहभाग असल्याने येथील सिनेरसिकांनी या चित्रपटाला प्रतिसाद दिला.
विद्या हिने महाविद्यालयीन जीवनात अभिनयाचा ठसा उमटवला. नाट्यक्षेत्रातून हा प्रवास रूपेरी पडद्यावर पोहोचला. सहकलाकार म्हणून विद्याची भूमिका असलेला "सुपर्ब प्लान' हा मराठी चित्रपट मर्डर मिस्ट्री आहे. दिग्दर्शक जय तारी पटकथा लेखक डॉ. सुधीर निकम यांच्यामुळे तिला या चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. विद्या या चित्रपटातील एका खटल्यात सहतपास अधिकारी असलेल्या निकिता निकमच्या भूमिकेत आहे.
चांगली भूमिका हवी
नाटक,चित्रपट या क्षेत्रात काम करताना भूमिका छोटी की मोठी याचा कधी विचार केला नाही. आपल्याला जी भूमिका मिळाली त्यात समरस होऊन त्याला न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. एखाद्या भूमिकेच्या माध्यमातून समाजाला काही चांगला संदेश देता यावा, त्या अभिनयाची छाप पडावी, अशी कलाकारांची इच्छा असते. तशा भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. कामावर निष्ठा असल्यास ध्येयापर्यंत पोहोचणे अवघड नाही,
असे मला वाटते.” विद्या सावळे, सिनेअभिनेत्री,बार्शी