आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCUSIVE: सरस्वतीच्या अराधनेला लक्ष्मीची पाऊले; दोन्ही हात नाहीत, पायाने लिहिले पेपर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तिला जन्मत:च  दोन्ही हात नाहीत, पण देवाने कुशाग्र बुद्धी तिला दिली आहे. लक्ष्मी शिंदे तिचे नाव. चक्क पायाने लिखाण करीत लक्ष्मीने बारावीचे पेपर दिले आणि ६५ टक्के गुण मिळवून आपल्यावर सरस्वती प्रसन्न असल्याचे दाखवून दिले.

विशेष म्हणजे तिचे  वडील संजय शिंदे निरक्षर आहेत. उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात. आई कविता शिंदे या गृहिणी आहेत. लक्ष्मी सर्वात मोठी मुलगी असून तिला अजून तीन बहिणी व एक भाऊ आहे. लक्ष्मीला कलेक्टर व्हायचे आहे. तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहाेचवण्याचा निर्धार वडिलांनी व्यक्त केला.
 
लक्ष्मी शिंदे वालचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.  तिने पायाने पेपर लिहीत १२ वीत ६५ टक्के गुण मिळवले. एकीकडे हलाखीची परिस्थिती आणि दुसरीकडे दोन्ही हात नाहीत. अशा परिस्थितीतही संघर्ष करत लक्ष्मीने मिळवलेल्या यशामुळे तिचे कौतुक होत आहे.
 
दहावीत मिळाले होते ४८ टक्के गुण
१० वीच्या परीक्षेत लक्ष्मीला उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी लेखनिक घेण्याची मुभा होती. मात्र ते नाकारत लक्ष्मीने जिद्दीने पायाच्या बोटांनी सर्व पेपर सोडवले. दहावीत तिला  ४८% मिळाले होते. त्या वेळी लक्ष्मीचा सोलापूर महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला होता. यानंतर लक्ष्मीने कला शाखेत प्रवेश घेतला होता.
 
कलेक्टर होण्याचे स्वप्न : नुकत्याच जाहीर झालेल्या  १२  वी परीक्षेच्या निकालात लक्ष्मीने १०वीपेक्षा १७ टक्के गुण जास्त मिळवत पुन्हा एकदा स्वत:मधील जिद्द व चिकाटी सिद्ध केली आहे. पुढे हीच जिद्द कायम ठेवत स्पर्धा परीक्षा देऊन कलेक्टर होण्याचे लक्ष्मीचे स्वप्न आहे.
बातम्या आणखी आहेत...