आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊस दर आंदोलन स्थगित, सहकार मंत्र्यांचे एफआरपी अधिक 400 रुपये भाव देण्याचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-  ऊस दराचे कोडे अखेर आज सुटले आहे. पंढरपूर येथील बाजीराव विहिरीजवळ उपोषणाला बसलेल्या स्वाभिमानीच्या समाधान फाटे व सहकाऱ्यांची प्रकृती खालावत चालली असतानाच एफआरपी अधिक 400 रुपये भाव देण्याचे आदेश सुभाष देशमुख यांनी कारखान्यांना दिले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी उपोषण सोडले आहे.

 

 

शासनाच्या एफआरपीपेक्षा अधिक चारशे रुपये प्रति टन दर देण्याचे मान्य करण्यात आल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी उपोषणकर्त्यांना दिली. या रकमेपैकी एफआरपी आधिक 300 रुपये रोख व 100 रुपये एक महिन्याने दिले जाणार आहेत.

जे कारखाने हा दर मान्य करणार नाहीत त्यांच्या समोर पुन्हा उग्र स्वरूपाचे स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी बाजीराव विहीर येथे बोलताना सांगितले. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ऊस दराचे कोडे पंढरीत उपोषणकर्त्यामुळे सुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...