आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसउत्पादक देणार प्रतिटन १० रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानच्या सुवर्ण सिद्धेश्वर अभियानासाठी पाच वर्षे टनामागे दहा रुपये मदत देण्याचा ठराव सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सभेत शेतकरी सभासदांनी केला. सिद्धेश्वर देवस्थान समितीने सुवर्ण सिद्धेश्वर महाअभियान हाती घेतले आहे. यासाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी या अभियानासाठी सभासदांना मदतीचे आवाहन केले. ते म्हणाले, सोलापूरचे श्रद्धास्थान असलेले सिद्धेश्वर मंदिर ३५ एकर क्षेत्रावरील आहे. नयनरम्य तलावामुळे पर्यटनाला चांगला वाव आहे.गाभाऱ्यासाठी७०० किलो चांदी सध्या जमा झाला आहे. ५० कोटी रुपये खर्चाचा सुवर्ण सिद्धेश्वराचा आराखडा तयार आहे. आपल्या कारखान्याचे एकूण २५ हजार सभासद आहेत. प्रत्येक सभासदांनी एक टनामागे दहा रुपये मदत पाच वर्षे दिल्यास हे अभियान नक्कीच पूर्ण होईल. त्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन करताच टाळ्याच्या गजरात एकमुखी ठराव करून सर्व सभासद शेतकऱ्यांनी टनामागे १० रुपये मदत देण्यास संमती दिली.

सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र दक्षिण उत्तर सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट, मोहोळ तुळजापूर तालुका आहे. या भागातील जनतेमध्ये सिद्धेश्वर देवस्थान आदराचे स्थान आहे. प्रत्येक वर्षे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासद बिगर सभासद अशा शेतकऱ्यांच्या ते लाख टन उसाचे गाळप होते. त्यापैकी सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाच लाख टन उसाचे गाळप झाले. तर टनामागे दहा रुपये याप्रमाणे या अभियानाला मदत मिळाली तर वर्षाला पाच कोटी रुपये मिळतील. त्यामुळे पाच वर्षात या अभियानाला २५ कोटी रुपये मिळतील. त्यामुळे ५० कोटी रुपये खर्चाचे हे अभियान पूर्ण होण्यात सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांचा सिंहाचा वाटा राहील, हे नक्की.