आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साखर आयुक्तालयाचे उपकार्यालय लवकरच सोलापुरात सुरू होणार’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - सोलापूर परिसरातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे येथील साखर आयुक्तालयाचे उपकार्यालय लवकरच सोलापुरात सुरू होईल, अशी माहिती राज्याचे सहकार पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. रविवारी (दि. १०) दक्षिण सोलापूर तालुका मराठी पत्रकार संघाने आयोजिलेल्या वार्तालापप्रसंगी ते बोलत होते.

सहकारमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाने जास्त आहेत. पुणे येथे साखर आयुक्तालय असल्याने अनेक अडचणी येत होत्या. सोलापुरात उपकार्यालय व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. पण त्याची कार्यवाही झाली नाही. मी सहकार खात्याचा पदभार घेतल्यानंतर संबंधितांशी बोललो. त्यामुळे आता हे कार्यालय लवकरच सोलापुरात सुरू होईल. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मंद्रूपला बाजार समितीचा प्रश्न सुटेल. तसेच रस्ते पाण्याचा प्रश्न सोडवताना बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी उद्योगवाढीवर आपला भर राहील. यावेळी संघाचे राज्य अध्यक्ष मनीष केत तालुकाध्यक्ष संजीव इंगळे यांच्या हस्ते सहकारमंत्री देशमुख यांचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

सोलापूर बाजार समिती निवडणूक लढवणार
गेल्या वेळेस राज्यात सत्ता नसतानाही सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढवली. आता तर मी सत्तेत आहे. शिवाय सहकार पणन खात्याचा मंत्री आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने उतरणार आहे. तालुक्यातील नेते, शेतकरी कार्यकर्त्यांना जे हवे आहे, त्याच पद्धतीने निवडणुकीसाठी सर्वांशी आघाडी होईल.

हसापुरे, शिवदारे, शेळके भेटले देशमुखांना
सहकार पणनमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल देशमुख यांचा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके श्रीशैल नरोळे यांनी रविवारी सत्कार केला. आगामी बाजार समितीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून ही मंडळी देशमुखांना भेटली. त्यावेळी अविनाश महागावकर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत तुमच्या मनासारखे घडेल, असे सूचक वक्तव्य देशमुखांकडे पाहात केले. त्यामुळे या निवडणुकीसाठी आता देशमुखांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...