आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय शुगर्सने ऊसबिल थकवले, शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ऊस गाळपाला वर्ष उलटूनही ऊसबिलांची थकीत रक्कम मिळत नसल्याने उंदरगाव (ता. माढा) येथील एका महिलेसह पाच शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. खासदार विजयसिंह मोहिते यांच्या ताब्यात असलेल्या विजय शुगर्सने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १६ कोटी रुपयांची रक्कम थकविल्याने शेतकऱ्यांना हा शेवटचा मार्ग अवलंबवावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची या महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
उंदरगाव येथील अमर नागनाथ मस्के, विजया चंद्रकांत लवटे, दिनकर नामदेव चव्हाण आणि औदुंबर तुकाराम चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याच्या उद्देशाने ड्रममध्ये रॉकेल आणले होते. कार्यालयातील पोर्चसमोर असलेल्या बाकड्यावरबसून चारही शेतकऱ्यांनी विजय शुगर्सच्या विरोधात घोषणाबाजी करीत रॉकेल अंगावर आेतून घेतले. यावेळी पोलिस नागरिकांनी चारही शेतकऱ्यांकडील रॉकेल काडीपेटी काढून घेऊन त्यांना ताब्यात घेतले. या शेतकऱ्यांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळीची अंघोळ
गेल्या वर्षभरापासून थकीत देणी देण्यास विजय शुगर्सकडून टाळाटाळ केली जात आहे. कारखान्याकडून दिलेले धनादेशही वटले नाहीत. शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रशासनाकडून विचार केला जात नाही. याबाबत वारंवार निवेदन देऊन, तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करीत असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे थकीत रकमा मिळत नाहीत. यामुळे आज आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळीची अंघोळ करण्यात येणार आहे. - दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना.

प्रशासन बैठकांमध्येच मश्गुल
एफआरपी रक्कम दिल्याने जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे ९० कोटी रुपये थकीत आहेत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्तही प्रकाशित केले होते. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी कारखान्यांना थकीत रकमा देण्याबाबत २० नोव्हेंबरपर्यंत मुदत देऊनही दोन कारखाने वगळता प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या रकमा थकविणाऱ्या कारखाना संचालक प्रशासनावर कारवाई कधी करणार, असा प्रश्न आंदोलन ऊस उत्पादक शेतकरी यांनी केेला आहे.

सूचना - या बातमीस दोन फोटो आहेत....रामेश्वर गुन्हा दाखल झाल्याची जोड काॅपी देणार आहेत............
जिल्हाधिकारी कार्यालयात रॉकेल ओतून स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

आणखी किती दिवस वाट पाहायची?
^मागीलवर्षी विजय शुगर्सला ऊस घातला. ११ महिन्यांपासून थकीत देणी देण्याची मागणी करीत आहे. कारखान्याने ऊसबिलापोटी लाख रुपयांचा धनादेश दिला, मात्र तो अद्यापही वटला नाही. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊनही पैसे मिळत नाहीत. मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च कसा करायचा, देणी काढायची तर किती ? पैसे मिळणार म्हणून किती दिवस वाट पाहायची? -अमर मस्के, ऊस उत्पादक शेतकरी.
बातम्या आणखी आहेत...