आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यात ऊस दरासाठी शेतकऱ्यांकडून रास्ता रोको, पहिली उचल जाहीर करण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा (सोलापूर)- ऊसाला पहिला हप्ता 3 हजार रुपये मिळावा व ऊस दर साखर कारखानदारांनी जाहीर करावा या मागणीसाठी माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बळिराजा शेतकरी संघटना, माढा शहर शिवसेना व समस्त शेतकऱ्याच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
 
माढा-वैराग मार्गावर उदरंगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप, रयत क्रांती संघटना यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माढा तालुक्यातील साखर कारखानदारांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. ते फक्त बघ्याच्या भूमिकेत आहेत. शेतकर्ऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता घामाने पिकवलेल्या शेतकर्ऱ्यांच्या उसाला पहिला हप्ता 3 हजार रुपये तात्काळ जाहीर करावा अन्यथा यापुढील दिवसात शेतकऱ्यांचा आक्रमकपणा काय असतो ते आम्ही  दाखवुन देऊ अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी आदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. फडणवीस सरकार राबवित असलेल्या धोरणाविरोधात यावेळी घोषणाबाजी करीत निषेध  नोंदवला गेला.
 
बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांनी यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर निशाणा साधला. भडारकवठे (ता.दक्षिण सोलापुर) येथील लोकमंगल कारखान्याच्यासमोर 17 नोव्हेबरपासुन बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या दोन्ही आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सामिल झाले होते. यावेळी शंभु साठे, किसन घोडके, भैय्या खरात, विशाल साठे, संदीप पाटील, पंडीत सांळुखे, अरविंद नाईकवाडे, बालाजी नाईकवाडे आदीसह अन्य शेतकरी सामील झाले होते. यावेळी माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...