आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊस शेतकऱ्यांचे पैसे बँकेत अडकले, द्यायचे कसे? निर्णयाच्या दहा दिवसांनंतरही स्थितीत बदल नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सहकारी बँकांमध्ये चलन नसल्याने ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती ढासळली. गावगाडा उधारीवर चालला तरी आैषधोपचार, लग्न, बी-बियाणे खरेदी आदींसाठी पैसे नाहीत. सहकारी बँकांतील पैसा राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवतो. त्याच्या प्रमाणात दहा टक्के तरी रक्कम दिली तरी प्रश्न सुटतो. पण स्टेट बँक ऑफ इंडिया त्याची दखल घेत नाही. त्यामुळे सहकारी बँका बंद ठेवण्याची वेळ आली, असा इशारा सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लुणावत यांनी दिला.
शुक्रवारी असोसिएशनची बैठक झाली. त्यासाठी सहकार खात्याचे सहायक निबंधक विद्याधर माने आले होते. त्यांच्या समोर बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकांतील चलनस्थिती मांडली. रद्द झालेल्या नोटा भरून घेतल्या. ते घेऊन स्टेट बँकेने तातडीने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. आता ग्राहकांच्या हाती देण्यासाठी पैसे नाहीत. शहरात राष्ट्रीयीकृत बँकांचे जाळे आहे. म्हणून तेवढी आेरड नाही. परंतु ग्रामीण भागात विचित्र परिस्थिती निर्माण झाली. बहुतांश सहकारी बँकांमध्ये ऊस उत्पादकांच्या रकमा कारखान्यांनी जमा केल्या आहेत. ते देण्यासाठी सध्या चलन नाही.

निर्णयाचे स्वागत करतो. परंतु पर्यायी व्यवस्था करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. बँका म्हणजे केवळ राष्ट्रीयीकृत नाहीत. जिल्हा बँक आणि नागरी सहकारी बँकाही बँकिंग करतात. त्यांनाही चलन उपलब्ध करून द्यावे, असे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही स्थिती शासनाला कळवणार असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.
अश्विनी रुग्णालयातील ८० जणांनी घेतला लाभ
सोलापूर नवेचलन ग्राहकांच्या हाती देण्यासाठी स्टेट बँकेने नवनवीन प्रयोग सुरू केले. शनिवारी ‘पॉस’ (पॉईंट ऑफ सेल) प्रणालीने रुग्णालयात रुग्णांना त्यांच्या खात्यावरील पैसे दिले. अश्विनी सहकारी रुग्णालयातील ८० रुग्णांनी त्याचा लाभ घेतला.

यासाठी स्टेट बँकेचे कार्ड हवे. कार्ड स्वॅप केल्यानंतर संबंधितांच्या खात्यावरील रक्कम वजा होते. ती ग्राहकाच्या हाती रोखीने दिली जाते. स्टेट बँकेच्या बाळीवेस शाखेचे मुख्य व्यवस्थापक सुहास गंडी यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. रविवारी सुटीच्या दिवशीही ही सेवा देणार असल्याची माहिती श्री. गंडी यांनी दिली. अश्विनीसह मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ही प्रणाली सुरू करण्यात येईल.

तत्परसेवा : खानहसन सलमान (रा. सोलापूर, सध्या पुण्यात नोकरी) हे पुण्याहून सोलापूरला रेल्वेने येताना त्यांचे पाकीट गहाळ झाले. रोकड नसल्याने ते चिंतेत पडले होते. त्यांनी सदर बझार शाखेत संपर्क साधला. चालू कार्ड बंद केले आणि नवीन कार्ड पिनसह दिले. त्यानंतर खान पुण्याला रवाना झाले.

आणखी ३०० कोटी
^चलनपुरवण्यासाठी आणखी तीनशे कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून लवकरच येतील. स्टेट बँकेचे सर्व एटीएम पूर्ण क्षमतेने सुरू राहतील याची व्यवस्था केली. बँकेसमोरील गर्दीही आता थोडी आेसरली. काही दिवसांत स्थिती पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे.” सुहासगंडी, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक

नोटेची सत्यता यंत्रावरच तपासा
कॅशट्रॉनकिंवा फेक नोट अॅनालायझर मशिनवरच सत्यता तपासावी.
असे अॅपचे मेसेज आले तर त्याची पहिल्यांदा स्वत: खात्री करावी.
केवळ आलेले मेसेज तसेच पुढे फाॅरवर्ड करण्याआधी तपासावेत.

बुधवारपासून बंदच ठेवाव्या लागतील
^सहकारी बँकांना निधी दिला नाही तर बुधवारपासून बँका बेमुदत बंद ठेवाव्या लागतील. पुणे जिल्हा असोसिएशनने शनिवारपासून बंद ठेवण्याची सूचना केली. परंतु त्याने ग्राहकांचे नुकसान होईल. अवधी देऊन स्थिती पाहण्याचे ठरवले आहे. फार काही बदल दिसला नाही तर बँका बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही.” अशोकलुणावत, अध्यक्ष, जिल्हा नागरी सहकारी बँक्स
असोसिएशन

^विडी कारखान्याचे खाते ज्या बॅँकेत अाहेत त्याचे अधिकारी आणि कर्मचारी येऊन विडी कारखान्यामध्ये प्रथम एका आठवड्याची मजुरी देतील. तशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. त्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत, लवकरच एका आठवड्याची मजुरी दिली जाईल.”| बाळासाहेबजगदाळे, प्रवक्ते, सोलापूर विडी उद्योग संघ
प्रमाणात १० टक्के रक्कम देण्याची मागणी
सोलापूर मोबाइलवर‘मोदी के नोट’ नावाचे बनावट अॅप सेवेत आहे. नव्या नोटांची स्कॅनने तपासणी करून बनावट नोटा ओळखण्याचा दावा अॅपने केला असला तरी तो खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
‘मोदी के नोट’मधून नवी नोट स्कॅन करताच नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्रकार परिषदेतील नोट बंदीचे वक्तव्य दिसायला सुरू होते. तसे झाले तर ही नोट खरी समजायची, असे सांगितले जात आहे. मात्र, नवीन हजार रुपयांच्या गुलाबी नोटची छायांकित कृष्ण-धवल प्रत स्कॅन केल्यानंतरही मोदींचे भाषण सुरू झाले. यावरून हे अॅप दिशाभूल करणारे असल्याचे समोर आले आहे.
सोलापूर शंभरआणि पन्नासच्या नोटांची कमतरता असल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून महिला विडी कामगारांना मजुरी मिळाली नाही. काही दिवसात बॅँकांचे अधिकारी विडी कारखान्यात जाऊन मजुरी देतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिल्याची माहिती सोलापूर विडी उद्योग संघाचे प्रवक्ते बाळासाहेब जगदाळे यांनी दिली.
श्री. जगदाळे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी संघाने महिला विडी कामगारांच्या मजुरी संदर्भातल्या अडचणी सांगितल्या. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी बॅँक ऑफ इंडिया (अग्रणी) चे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की यांना सांगून संबंिधत बॅँकांतून नोटांची सोय करण्यास सांगितले. श्री. पत्की यांनी त्या बॅँकांना मेल करून त्याप्रकारे सूचना दिल्या.
सोलापूर सरकारनेपेट्रोल पंपावर स्वाइप मशिनवर रोकड देण्याची सोय उपलब्ध करण्याचे सांगितले. सोलापूर शहरात १७ तर जिल्ह्यात २०० हून अधिक पंप आहेत. मात्र एकाही पंपावर ही यंत्रणा उपलब्ध नाही. परिणामी पंपावरून नागरिकांना रोख रक्कम मिळत नाही. देशभरातील सुमारे २५०० पेट्रोल पंपावर ही सुविधा उपलब्ध असली तरीही यात सोलापूर जिल्हातील एकाही पंपाचा समावेश नाही. याविषयी विचारले असता ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नाही. पंपावर रक्कम काढण्याची अद्यावत मशिन उपलब्ध नाही. परिणामी नागरिकांना रक्कम कढता येत नाही, असे सोलापूर पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
बातम्या आणखी आहेत...