आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साेलापुरातील तिढा मिटला; सहकारमंत्र्यांचा कारखाना बंद ठेवताच उसाला 2350 रु. दर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्यालाच शेतकरी संघटनेने टार्गेट केल्याने मंगळवारी सायंकाळी कारखान्याचे संचालक शहाजी पवार यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना विश्वासात घेऊन ऊस दराची कोंडी फोडली. एफआरपी १९५० रुपये व अधिक  ४०० रुपये असे एकूण २३५० रुपये दर जाहीर करण्यात अाला. त्यापैकी २२५० रुपये पहिली उचल आणि १०० रुपये एक महिन्यानंतर बँक खात्यावर जमा करण्यावर एकमत झाले. हा दर जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांनी मान्य करावा, असे अावाहन करतानाच कारखान्यांनी दर न दिल्यास आंदोलन छेडून कारखाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनांच्या प्रमुखांनी स्पष्ट केले. मात्र हा तोडगा अमान्य असल्याने बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर बैठकीतून बाहेर पडले.   

 
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिनिधी म्हणून लाेकमंगलचे संचालक शहाजी पवार यांनी  चर्चा केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर, महामूद पटेल, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, जनहित शेतकरी संघटनेेचे प्रभाकर देशमुख उपस्थित होते. एक तासाच्या चर्चेनंतर निर्णय जाहीर केला.   


असा ठरला फाॅर्म्युला...   
शासनाने ९.५० टक्के उताऱ्यास २५५० रुपये दर जाहीर केला आहे. यातून प्रतिटन ६०० रुपये वाहतूक व तोडणी खर्च वजा जाता १९५० रुपये दर ठरतो.   चर्चेनुसार एफआरपी अधिक ४०० रुपये देण्यावर तडजोड झाली. पहिली उचल देताना एफआरपीची १९५० अधिक ३०० रुपये व उरलेले १०० रुपये एक महिन्यानंतर देण्याचे  ठरले.

बातम्या आणखी आहेत...