आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-सांगलीत ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण, ट्रॅक्टरचे टायर फोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर/कोल्हापूर- राज्यभर ऊस आंदोलन चिघळत आहे. ऊस दराबाबत सरकारशी बोलणी फिस्कटल्यानंतर आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी सोलापूरमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले, तर सांगलीत म्हैसाळमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायरच आंदोलकांनी पळवले.
 
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर-पुणे रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले. फॅबकेट शुगर फॅक्टरीकडे हा ट्रॅक्टर ऊस घेऊन निघाला होता. सांगलीमध्ये म्हैसाळ येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर पळवले. ऊस दराबाबत सरकार आणि शेतकरी संघटनांमधील सुरु असलेली बोलणी फिस्कटल्यानंतर, शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत ऊसाला टनामागे 3 हजार 500 रुपयांचा दर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार असल्याचे शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...