आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजापूर रोड ते डीमार्ट रस्ता ऊस वाहतुकीमुळे धोकादायक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूर रस्त्यावरून सिंधू विहार, कुमठेकर हाॅस्पिटल, डीमार्ट, अासरा तसेच भारती विद्यापठी ते डीमार्ट या मार्गावर अवजड वाहने ऊस वाहतूक वाहनांना बंदी असताना वाहतूक सुरूच अाहे. पोलिसांनी तसा फलक रस्त्यावर लावला अाहे. तरीही ऊस वाहतूक अवजड वाहतूक सुरू अाहे. या भागात शाळा-काॅलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठी अाहे. नागरिकांनाही जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. ही वाहतूक थांबवण्याची मागणी होत अाहे.

सिंधू विहार ते कुमठेकर हाॅस्पिटल, डीमार्ट या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू अाहे. भारती विद्यापीठ, गोिवंदश्री मंगलकार्यालय ते डीमार्ट, अासरा या मार्गावरून ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरसह दोन ट्राॅलीव्दारे ऊस वाहतूक सुरू अाहे. या मार्गावर शाळा, काॅलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा असते. नागरिकांची वर्दळ असते.

डीमार्ट भागात भाजीविक्रेते, हातगाडीविक्रेत्यांनी ठाण मांडल्यामुळे ही गर्दी वेगळीच अाहे. अासरा रेल्वे पुलावर चढ असल्यामुळे ट्रॅक्टर ट्राॅलीचा प्रवास धोकादाय असतो. अनेकदा येथे मागे जीवे घेणे अपघात झाले अाहेत. अासरा पूल ते अासरा चाैकातही हातगाडी, भाजीविक्रेत्यांनी ठाण मांडले अाहे. अाणखी एखादा भीषण अपघात होण्याअगोदर ही ऊस वाहतूक बंद करण्याची मागणी अाहे.
बाळे चाैकातील वाहतूक नियोजनासाठी सोमवारी बैठक बाळे येथील खंडोबा यात्रेस १७ डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत सुरुवात होत अाहे.

हे अाहे पर्यायी मार्ग
विजापूर रस्ता ते सोरेगाव, गजानन महाराज मंदिर, कुमठे गाव रेल्वे गेट, विमानतळ, होटगी रस्ता अथवा सोरेगाव, अायटीअाय, संभाजी तलाव, पत्रकारभवन चाैक, महावीर चाैक, होटगी रोड.

दत्त चाैकात पुन्हा एकेरी मार्गाचा अवलंब
दत्तचाैकात एकेरी मार्गाचा अवलंब अाजपासून पुन्हा सुरू झाला अाहे. किल्ला बागेकडून दत्त चाैक, लक्ष्मी मार्केटकडे जाता येईल. सोन्या मारुतीकडून दत्त चाैक (मंदिरजवळून) किल्ला बागेकडे जाता येईल. किल्ला बागेकडून थेट लक्ष्मी मार्केटकडे ये-जा करता येणार अाहे. नागरिकांनी या एकेरी मार्गाचा अवलंब करावा असे अावाहन श्री. वाघमारे यांनी केले अाहे. हा मार्ग यापूर्वी एकेरी होता. फक्त अंमलबजावणी होत नव्हती. अाता व्हावी ही अपेक्षा

अाढावा घेऊन नियोजन
^जुळे सोलापूर म्हणजे सिंधू विहार, ते डीमार्ट अथवा भारती विद्यापीठ ते अासरा या मार्गावरील अाढावा घेऊन नियोजन करू. पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात येईल.'' एस. बी. वाघमारे, वाहतूकपोलिस निरीक्षक

भाजीविक्रेत्यांना रस्त्यावरून हटवा
आसरा रस्ता परिसरात भाजीविक्रेते रस्त्यावरच बसतात. त्यामुळे रस्ता अरुंद झाला अाहे. वाहतुकीची कोंडी, अपघाताचे प्रमाणही वाढले अाहे. अतिक्रमण पथक अाले की काही काळ तात्पुरते काम थांबते. पुन्हा काही मिनिटात जैसे-थे स्थिती अाहे. मैदानात जागा असताना तिथे भाजीिवक्रेते बसत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...