आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार मंत्र्यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर फोडल्या रक्ताच्या बाटल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ऊसदरच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात रान पेटले आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आज (शुक्रवार) जोरदार राडा झाला. आंदोलकांनी अंगावर चक्क रक्ताच्या बाटल्या फोडून घेतल्या. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव पसरला होता.

 

मिळालेली माहिती अशी की, प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर आंदोलन केले. दुसरीकडे, बळीराजा शेतकरी संघटनेने आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ऊसाला योग्य दर जाहीर करेपर्यंत बळीराजा संघटना कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली.

 

कार्यकर्त्यांनी अंगावर फोडल्या रक्ताच्या बाटल्या...
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर प्रचंड घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी अंगावर रक्ताच्या बाटल्या फोडून घेतल्या. या घटनेच्या प्रार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर  बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...