आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suggestions To Accelerate Development Of Electric Work

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्युत विकासाच्या कामांना गती देण्याच्या केल्या सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; जिल्ह्यातील मूलभूत सुविधा आराखड्याअंतर्गत विद्युत विकासाच्या कामाची गती अतिशय कमी आहे. आतापर्यंत झालेल्या कामांबाबत असमाधान व्यक्त करीत ही कामे अतिशय गतिमानतेने पूर्ण करावीत, अशा सूचना खासदार विजयसिंह मोहिते यांनी केल्या.
शासकीय विश्रामगृहात जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार शरद बनसोडे, आमदार हनुमंत डोळस, सुभाष देशमुख, नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, उपमहापौर प्रवीण डोंगरे, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, महावितरणचे मुख्य अभियंता एन. एस. इरवाडकर, अधीक्षक अभियंता एस. बी. साळे आदी उपस्थित होते.

एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमामध्ये सोलापूर शहरासह सर्व नगरपरिषद क्षेत्रासाठी विविध कामासाठी ११८ कोटी लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी या कार्यक्रमांतर्गत सोलापूर शहरासाठी जास्तीचा निधी मिळावा, अशी मागणी केली. त्यानुसार शहरांसाठी आवश्यक असलेल्या वाढीव कामाचा प्रस्ताव असल्यास नव्याने सादर करावा अशा सूचनाही खासदार विजयसिंह मोहिते यांनी दिल्या.

खासदार मोहिते यांनी मूलभूत सुविधा आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला. सदरची कामे केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत, कोणत्या प्रकारची किती टक्के कामे पूर्ण झाली याची माहिती घेतली. त्यानुसार सदर कामाची गती अतिशय कमी आहे. सर्व कामे गतिमानतेने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची मुख्य उद्दिष्टे, समाविष्ट करावयाच्या कामाचे घटक याबाबतची माहिती देण्यात आली. यानुसार कृषी ग्राहकांना योग्य दाबाने विद्युत पुरवठा करणे, अकृषिक ग्राहकांना अखंडित २४ तास विद्युत पुरवठा करणे, वाणिज्य तांत्रिक हानी कमी करणे, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे दीनदयाल ग्राम ज्याेती योजनेत विलिनीकरण पुढील आराखडा मंजूर करणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्ट आहे.

आदर्श गावामध्ये १.७३ कोटी रुपयांची कामे
आदर्शसांसद गाव अंतर्गत तुळशीला(ता. माढा) गाव योजनेअंतर्गत ८४.५८ लाखांची तर येवती (ता. मोहोळ) गावासाठी ९७.०६ लाख अशी एकूण कोटी ७३ लाख ४० हजार रुपयांची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत खासदार विजयसिंह मोहिते, खासदार शरद बनसोडे, आमदार डोळस, सुभाष देशमुख आदी.

४३४.९४ कोटींपैकी
२४.४९ कोटी मंजूर

सोलापूरजिल्ह्यासाठी फिडर सेपरेशनसाठी १०७.७१ कोटी, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे दीनदयाल ग्राम ज्योती योजनेत विलिनीकरणासाठी २३.६४ कोटी, विद्युत प्रणालीचे बळकटीकरण मिटरिंगसाठी ३०३.५९ कोटी असे एकूण ४३४.९४ कोटी रुपयांची योजना सादर केली. त्यापैकी २४.४९ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच तालुकानिहाय प्रस्तावित कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.