आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी वेळेत भेटल्याने आवारातच अत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी अालेले दिनकर दगडू भोसले (वय ४५. रा. अौंध हाॅस्पिटलजवळ, पुणे) यांनी जिल्हाधिकारी वेळेत भेटल्यामुळे विषारी अौषध पिऊन अात्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय अावारात घडली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

भोसले हे अकलूज येथील सुमीत्रा पतसंस्थेत लिपीक पदावर काम करीत होते. पतसंस्थेत अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला अाहे. दरम्यान, मंगळवारी ते जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला अाले होते. जिल्हाधिकारी बैककीमध्ये व्यग्र असल्यामुळे वेळेत भेटू शकले नाहीत. त्यामुळे भोसले यांनी विष प्यायले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय अावारात एकच गोंधळ उडाला. अापत्ती व्यवस्थापन अधिकारी सुनील कालंदे यांनी उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची प्राथमिक नोंद अाहे. पतसंस्थेत काहीजणांनी दबाव अाणून पैसे भरण्यास भाग पडल्यामुळे मानसिक त्रास होत असल्याने ते आले होते.