आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैरागच्या वीटभट्टीमालकाची गळफास घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - वैराग येथील एका वीटभट्टीमालकाने अज्ञात कारणाने दोरीने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंगणी रस्ता परिसरात मंगळवारी (दि. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शंकर अंबऋषी गरड (वय ५५, रा. वैराग) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी बार्शी तहसीलकडून वैराग येथील अतिक्रमित विनापरवाना वीटभट्टीचालकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढून घ्यावे, असे त्या नोटिसीत म्हटले होते. तसेच नुकतेच पुन्हा नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे वीटभट्टीचालक, मालक कारवाईच्या भीतीने तणावाखाली होते. या पार्श्वभूमीवर शंकर गरड यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर वैरागमधील वीटभट्टीचालक, मालक संघटनेने एकत्र येऊन महसूल प्रशासनाचा निषेध केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वीटभट्टी संघटनेने पुकारलेल्या वैराग बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. गरड यांच्या मागे आई, पत्नी, दोन
मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

तहसीलदारांशी चर्चेनंतर मृतदेह ताब्यात
तहसीलदारांनीयेऊन चर्चा केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यानंतर तहसीलदार बालाजी सोमवंशी, पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी मृताच्या नातेवाईक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. त्यामुळे शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.