आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त 8 शेतकरी कुटुंब मदतीसाठी अपात्रच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - 9 नोव्हेंबरते २१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जबाजारी आणि नापिकी यामुळे आत्महत्या केली आहे. शासकीय निकषानुसार यातील एकही शेतकरी कुटुंब मदतीस पात्र ठरू शकले नाही. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या दालनात झाली. या बैठकीत जिल्ह्यात प्राप्त 8 प्रकरणांवर चर्चा झाली. मात्र या प्रकरणांना शासनाच्या निकषानुसार मदत देता येत नसल्याकारणाने ती नामंजूर झाली आहेत.

नान्नज येथील बाळू यशवंत दुधाळ, गाडेगाव येथील विश्वनाथ शंकर भालके, कारी येथील पांडुरंग अर्जुन शिंदे, भालेवाडी येथील रामचंद्र लक्ष्मण तरंगे, दहिटणे येथील हुसेनी बाबू शेख, इंगळगी येथील साहेबलाल महिबूब मुल्ला, नरखेड येथील पांडुरंग मारुती मोटे या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत आत्महत्या केल्या आहेत. यामधील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन तर एका विषारी औषध प्राशन करून तर एकाने रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली आहे. मदतीसाठी या वेळी जिल्हा पोलिस प्रमुख एस. वीरेश प्रभू, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. बी. बिराजदार, तहसीलदार मिनल भामरे-मुळे, शेतकरी प्रतिनिधी परमेश्वर राऊत (पेनूर), सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी विजय अवघडे (करमाळा) उपस्थित होते.

तीन निकषांची पूर्तता नाही
आत्महत्याकेलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासनाने तीन निकष दिले आहेत. यामध्ये सलग तीन वर्षे नापिकी, कर्जबाजारीपणा वसुलीसाठी तगादा या गोष्टी असतील तरच त्याला शासनाची मदत मिळते. यामध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या असल्या तरी इतर कारणे नसल्याने मदतीसाठी ही प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत.