आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने बँकेच्या मागील दारातून धनदांडग्यांना बदलून दिल्या नोटा, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कोणालाही विश्वासात घेता अचानक नोटाबंदीचा निर्णय घेऊन भाजपने सर्वसामान्यांना रांगेत उभे केले तर धनदांडग्यांना बॅँकेच्या मागील दारातून अमर्यादित नोटा बदलून दिल्या, असा सणसणाटी आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. 

कस्तुरबा मंडईच्या मागील महापालिका शाळेच्या मैदानात शनिवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 

उजनी जलवाहिनी सोलापुरात आणली तेव्हा सहा लाख लोकसंख्या होती. आता दुप्पट झाली आहे. मग पाण्याची कमतरता होणारच. तरी आम्ही ती अडचणही सोडवत आहोत, असे शिंदे म्हणाले. या वेळी प्रभाग १, ३, ४, ५, मधील काँग्रेसच्या उमेदवारांना एकत्रित बोलावले होते. 

व्यासपीठावर प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, अॅड. यू. एन. बेरिया, विश्वनाथ चाकोते आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

आम्ही विकास केला म्हणून स्मार्ट सिटीत नाव 
आम्हीकॉँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर शहराचा विकास केला म्हणून स्मार्ट सिटीच्या यादीत शहराचे नाव आले. मुख्यमंत्री हे नागपूरचे महापौर होते. त्यांनी नागपूरचा विकास केला असता तर नागपूरचे नाव तिसऱ्या यादीऐवजी पहिल्या यादीत अाले असते, असा टोलाही श्री. शिंदे यांनी लगावला. 
 
महापालिकेतील भ्रष्टाचाराने शहराचे आराेग्यच बिघडले! नरसय्या आडम यांचा घणाघात 
महापालिकेतीलभ्रष्टाचाराने शहराचे आरोग्य बिघडले आहे. एक सुविधा नीट नाही. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला, बागा उजाड झाल्या, प्रसूतिगृहांची दुरवस्था झाली, शाळा नगरसेवकांनीच लाटल्या. इतकेच काय स्वच्छतागृहेही सोडली नाहीत. एकंदरीत स्थिती पाहिली तर सामान्यांच्या सुविधा कायमच्या बंद होतील की काय? अशी भीती निर्माण झाल्याचे माकपचे नेते नरसय्या आडम यांनी सांगितले. 

पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कुमठा नाका येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बाेलत होते. पुढे म्हणाले, “स्थायी समितीत पाकीट दिल्याशिवाय विषयांना मंजुरी मिळत नाही. पदाधिकारी, अधिकारी आणि कंत्राटदारांची अभद्र युती झाली. काही कंत्राटदार पुढे पालिकेचे सदस्य झाले. त्यामुळे या शहराचा विकास होईल कसा? अशा सत्ताधाऱ्यांना कायमचे घरी पाठवा.” 

आजपदयात्रा, सभा 
रविवारीमाकप लढवत असलेल्या सर्व १२ प्रभागांतून पदयात्रा काढण्यात येणार आहेत. दुपारी दत्तनगर येथे जाहीर सभा असून, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्धीप्रमुख अनिल वासम यांनी केले. 
 
राष्ट्रवादीचा पदयात्रेवर भर 
राष्ट्रवादीकाँग्रेसने महापालिका निवडणुकीत ५६ उमेदवार उभे केले आहेत. प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने रविवारी शिवजयंती मिरवणुकांमुळे शनिवारीच पदयात्रा, रॅलीवर भर दिला. प्रभाग ५, ७, १३, २३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पदयात्रा काढली. रात्री प्रभाग २३ मध्ये प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची सभा झाली. रविवारी सकाळी प्रभाग मध्ये खासदार विजयसिंह मोहिते यांच्या पदयात्रेने प्रचाराचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली. 
 
डमी मतदान यंत्राद्वारे भाजपचा घरोघरी प्रचार 
सोलापूर भाजपचेउमेदवार प्रचारासाठी डमी मतदान यंत्र सोबत घेऊन घरोघरी जात आहेत. त्या मशीनवर प्रभागातील चारही उमेदवारांची नावे त्यांचे चिन्ह आहे. होम टू होम प्रचारात मतदारांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. 
 
पुढील स्लाइडवर वाचा...
- घोटाळे थांबण्यासाठी पालिकेत आवश्यक आहे भाजपची सत्ता, कर्नाटकातील खासदार शोभा करंलाजे यांचे आवाहन..
भाजप पूर्वी साधुसंतांचा पक्ष, आता बनलाय संधीसाधूंचा, शिवसेनेचे स्टार प्रचारक डॉ. शिवरत्न शेटे यांची टीका...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...