आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षणाला पाठिंबा, दलित आरक्षणास धक्का नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - ‘मराठामोर्चे शांततेने निघत आहेत. मोर्चा झाल्यावर साफसफाई करतात. हे कौतुकास्पद आहे. आरक्षणांच्या मुद्यावर दलित आणि मराठा यांच्यात भांडण असता कामा नये. दलितांचा आरक्षणांचा मुद्दा नाही. मराठा आरक्षणास पाठिंबा आहे. दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही.’, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
प्रगतीविषयी बोलताना शिंदे म्हणाले की, जीवनात पुढे जायचे असेल तर गाव साेडण्याची तयारी हवी. तरुणांनी दहावेळा विचार करून योग्य वेळी रिस्क घ्यायला पाहिजे. तरुणांनी मूठ उघडून बघावे भविष्य दिसेल.

सिध्देश्वर बँक सांस्कृतिक मंडळातर्फे नवरात्र महोत्सवानिमित्त शारदीय व्याख्यानमालेत प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. मुलाखत पत्रकार अरविंद जोशी यांनी घेतली. यावेळी राजशेखर शिवदारे, बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभीरे, महापौर सुशीला आबुटे, संजय घाळे, मिलिंद लिंगाडे आदी मंचावर होते.

शिंदे यांनी बालपण, आयुष्यात घेतलेल्या दोन मोठ्या रिस्क, काॅलेज जीवन जगत असताना साहित्याचा पडलेला प्रभाव, राजकारणात, गरिबी आदी मुद्यावर मांडणी केली.
ते म्हणाले की, केंद्रात मंत्री असताना अफजल गुरूसह दहशवाद्यांना फाशी दिली. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. सर्व प्रक्रियेची पूर्तता केली. हे करत असताना समाज मनावर होणारे परिणाम पाहता गुप्तता पाळली. मी माझे कर्तव्य पार पाडले. मी बालपणी नकळत चोरी केली. त्यावेळी माझ्या सावत्र आईला ते कळले त्यांनी मला थोबाडीत मारली. देवापुढे नेऊन शपथ घातली. त्यानंतर मी कधी चोरीचा विचार केला नाही. गरिबीमुळे अनेक खासगी ठिकाणी काम केले. डाॅ. वैश्यंपायन यांनी मला घरी नेले १२ रुपयांची नोकरी दिली. शिकलो. न्यायालयात वर्षे नोकरी केली. वकील पदवी घेतली. फौजदार झालो. नंतर राजकारणात आलो. मी नोकरी सोडण्याची रिस्क घेतली. त्यामुळे तरुणांनी विचार करून जीवनात रिस्क घेतली पाहिजे.”

नेतृत्व हिसकावून घ्यावे लागते
राजकारणात नेतृत्व हिसकावून घ्यावे लागते. शांतपणाने काम केले पाहिजे आणि तरुणांना नेतृत्व दिले पाहिजे. आक्रमक माणसे सत्तेत गेल्यावर मवाळ होतात. काॅलेज जीवनात सर्व भूमिका तरुण मनावर कोरली. साहित्यातील शब्दांची ताकद कळाली. साहित्य प्रबोधनाचे कार्य करते. समाजाला नेतृत्व देते. माणसाला जिवंत ठेवते. आता डोळ्यास कमी दिसत असल्याने मी वाचू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...