आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमुक्तीसाठी शिंदे रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कर्जबाजारी शेतकरी संकटात सापडला आहे. शेतक-यांना कर्जमुक्त करा, यासह विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सत्ताधारी राज्य केंद्र शासनाकडून सामान्यांना दिलासा मिळत नसेल तर ते सरकार जाळायचे काय? असा खडा सवाल सुशीलकुमार यांनी केला.
दुपारी साडेतीन वाजता चार हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले, त्यावेळी शिंदे बोलत होते. पावणेदोन वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची तेथे उजळणी केली. सोलापुरात नवे उद्योग आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अनेक उद्योग परत गेले. पॉवरग्रीडसाठी उजनी धरणातील पाण्याची स्वतंत्र तरतूद करून घेतली. सत्ता असो किंवा नसो मी जनतेच्या सोबत राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मानेंकडून राष्ट्रवादीचे कौतुक : माजीआमदार दिलीप माने यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. शरद पवार यांचे मध्यावधी निवडणुकीचे भाकित मुंबई महापालिका निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, असे सांगत माने यांनी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचेच अधिक कौतुक केले.

जिल्हाधिकारी मुंढे यांना दिले निवेदन
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यावेळी माजी केंद्रीयमंत्री शिंदे, हर्षवर्धन पाटील, आमदार भारत भालके यांनी जिल्ह्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. सहा मिनिटे संवाद चालला. दुष्काळसदृश स्थितीबाबत आढावा घेण्याच्या जिल्हाधिकारी मुंढे यांनी लागलीच सूचना दिल्या.

शिंदेंचा लोकांसाठी पहिला मोर्चा
इंदिरागांधी यांच्या समर्थनार्थ पहिल्या मोर्चात ते सहभागी झाले होते. त्यानंतर लोकआंदोलनात ते प्रथमच रस्त्यावर उतरले. कायम सत्तेत राहिल्याने त्यांचा हा पहिलाच मोर्चा होता. मोर्चामध्ये आमदार प्रणिती शिंदे, आमदार रामहरी रुपनर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महापौर सुशीला आबुटे, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, माजीमंत्री आनंदराव देवकते, मनपा महिला बालकल्याण सभापती अश्विनी जाधव, सभागृह नेते संजय हेमगड्डी यांच्यासह असंख्य काँग्रेसजन होते.

जिल्हाधिका-यांवर टीकास्त्र: काँग्रेसजिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी जिल्हाधिकारी मुंढे यांच्यावर टीकास्त्र सोडले. टँकर मंजूर करीत नाहीत. जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने दुष्काळाची मदत मिळत नाही. फेर आढाव्याची गरज असताना दुर्लक्ष करत असल्याची टीका केली.

काँग्रेस - राष्ट्रवादीने कारभार पाहावा आणि भाजप-सेनेने आंदोलन करावे, असे गेल्या अनेक वर्षांचे राज्यातील सूत्र होते. पण, सत्तेची भाकरी उलटली अन्् प्रस्थापित सत्ताधारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले. आम्ही सत्तेत असताना कसे महत्त्वाचे निर्णय घेतले अन्् विरोधक सत्ताधाऱ्यांची भूमिका कशी कचखाऊ आहे, हे सांगण्यासाठी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री यांच्यासह राज्यातील माजी मंत्री आजी-माजी आमदारांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला.
सत्ताधारी अन् विरोधकांच्या भूमिकेत झाली अदलाबदल धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

मंत्रिमंडळात गटबाजी
माजीसहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘सरकार चालवण्यासाठी क्षमता अन् धाडस लागते. आम्ही सत्तेत असताना दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धडाक्याने निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिला. टँकर सुरू करायचा असला तरी विभागीय आयुक्तांची मंजुरी लागते. जिल्ह्यातील ३५ गावांमध्ये गारपीट झाली. पण, इतर ११०० गावांवरून गारा गेल्यामुळे पिकांवर परिणाम झाल्याच्या कारणात्सव पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली, धनगर, मुस्लिम मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.'