आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushma Swaraj Ministry Help To Patient In Alaska

बंगळुरूत ट्विट, अलास्कामध्ये हवाई प्रवाशावर उपचार- स्वराज यांच्या खात्याची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कॅलिफोर्निर्यात मुलीकडे हवाईमार्गाने निघालेल्या सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. गिरीश चंडक यांना प्रवासात असतानाच पक्षाघाताचा सौम्य झटका अाला. वैद्यकीय मदतीसाठी त्यांना अलास्का येथे विमानातून उतरवण्यात अाले. तेवढ्यात बंगळुरू येथील नातवाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यूएस अॅम्बसी यांना रात्री ट्विट करून घटना कळवली. अवघ्या तासात त्यांना वैद्यकीय सेवा मिळाली. ही घटना शनिवारी रात्री घडली. आज त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
डाॅ. गिरीश चंडक (वय ७७) त्यांच्या पत्नी तारा चंडक (७४) या कॅलिफोर्नियास्थित मुलगी वृषाली तापडिया हिच्याकडे कॅथे पॅसेफिक या कंपनीच्या विमानाने १६ एप्रिल रोजी निघाले होते. पॅसेफिक ओशन येथे १५ एप्रिलची ती रात्र होती. यावेळी पॅसिफिक ओशन येथून विमान जात असताना चंडक यांना पॅरालिसिसचा सौम्य झटका आला. चीन येथील सहप्रवासी डाॅक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांनी तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार अलास्का येथे त्यांना प्रवासातून उतरवले.
अँकरेजशहरातील प्रॉव्हिडन्स हेल्थ सेंटर या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. चंडक दाम्पत्यांच्याबरोबर यावेळी कोणीही नव्हते. भारतात बंगळूरू येथे रहात असलेला त्यांचा मोठा मुलगा मनिष चंडक यास घटनेची माहिती मिळाली. कठणीप्रसंगी मदतीसाठी मनिष हे परदेशातील मित्र-नातेवाईक यांच्याकडून काही मदत मिळेल काय? याच्या प्रयत्नासाठी फोन करत होते. दरम्यान मनिष यांचा मुलगा हर्ष याने सुषमा स्वराज तसे यूएस अॅम्बसी यांना ट्विट द्वारे ही माहिती दिली.

आयटी क्षेत्रातील उद्योगपती एशियन अलास्कन कल्चरल सेंटरचे सदस्य संजय तलवार यांना ही माहिती मिळाली. सुमारे तासभरात ते पत्नीसह रुग्णालयात दाखल आले. त्यांनी चंडक दाम्पत्यांची भेट घेतली. तारा चंडक यांना काहीच कळेना, की आपल्याला येथे कोणीही ओळखत नाही. तरीही आपल्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळत असल्याचे अाचंबित झाले. संजय तलवार यांनी हर्ष याने बंगळुरू येथून टिविट केल्याचे सांगितले तो ट्विट त्यांना दाखवला. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांची मुलगी वृषाली ही यावेळी तेथून १७ तास दूरवर असलेल्या कॅलिफोर्निया शहरात होती.- डॉ. गिरीश चंडक
चंडक यांची प्रकृती स्थिर
श्री.चंडक यांची प्रकृती स्थिर अाहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मुलगी वृषाली तापडिया हाँगकाँगस्थित मोठा मुलगा निमिष रुग्णालयात त्यांच्या समवेत सध्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, नातवाची समय सुचकता....