आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमधून उडी घेतलेल्या संशयित चोराचा मृत्यू, जुना पुणे नाका येथे घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : कोल्हापूर-सोलापूरएसटीतून प्रवास करताना केसरिसंग दवेज (रा. सातारा) यांच्याजवळचे तीस हजारांचे बेन्टेक्स दागिने चोरून नेताना दोघा संशयित चोरांनी बसमधून उडी घेतली होती. त्यातील एकाचा बुधवारी मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटली नाही. त्याच्या साथीदारावर उपचार होत आहेत. त्याचे नाव जाधव असून तो निगडी (पुणे) येथील असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार तपास होत असल्याचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी दिली.
पंढरपूर येथे ते दोघे तरुण बसमध्ये बसले होते. सोमवारी रात्री पावणेबाराला जुना पुणे नाकाजवळ बस थांबली. त्यावेळी त्या दोघांनी दवेज यांच्याजवळच्या दागिन्यांची पिशवी घेऊन बसच्या खिडकीतून उडी घेतली. जखमी झाल्यानंतर दोघांना हवालदार नागणे यांनी उपचाराला दाखल केले होते. बुधवारी त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार होत आहेत. फौजदार चावडी पोलिसात घटनेची नोंद आहे.