आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडतर्फ चावीवाले पुन्हा सेवेत, दोन महिन्यांचे वेतन मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे थकित तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचे वेतन देणे, अशोक लेलँड कंपनीकडून चेसी क्रॅक झालेल्या बस बदलून घेणे बस दुरुस्तीस ३० लाख रुपये देण्याचा निणर्य महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी घेतला आहे.
महापालिका परिवहन समिती, प्रशासनाची महापालिका आयुक्त काळम-पाटील यांच्यासमवेत मंगळवारी बैठक झाली. चेसी क्रॅक असल्याने वापरण्यास अयोग्य ४६ बस वॉरंटीतील असल्याने कंपनीला रितसर नोटीस देऊन नवीन बस घेण्याचा निर्णय झाला. कंपनीकडे नवीन बससाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.

बडतर्फ ४४ चावीवाले कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा तातडीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मंगळवारी सभागृहात दाखल करताच आयुक्त काळम-पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत पूवर्वत करण्याचा आदेश काढला.

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कामातील शिस्तभंग प्रकरणी बडतर्फ केले होते. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मनपा स्थायी समितीकडे रितसर दाद मागावी असे सूचवले होते. दरम्यान, स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री असताना संबंधितांना सेवेत पूवर्वत घेण्याचा ठरावही झाला. तो ठराव विखंडित करण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे पाठवला होता. शासनाने तो प्रस्ताव अमान्य केल्यानंतर हे प्रकरण रखडले होते.

कामावर घेण्याचे आदेश
४४जणांना २१ ऑक्टोबरपासून कामावर हजर होण्याचे आदेश आयुक्त काळम-पाटील यांनी दिले. ३१ ऑगस्ट सप्टेंबर २०१४ पासून बडतर्फ असलेल्या कालावधीत बिनपगारी ग्राह्य धरून कामावर घेण्यात आले असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

लक्षवेधीची मागणी
सभागृहातमहिला बालकल्याण समितीच्या विषयावर भाजपचे प्रा. अशोक निंबर्गी यांनी लक्षवेधीची मागणी केली. नगरसेवक सुरेश पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या तातडीच्या प्रस्तावाला विरोध केला. आपण कामगारांच्या बाजूने आहोत, पण या प्रकरणी रितसर प्रस्ताव दाखल करण्यात यावा, अशी सूचना सुरेश पाटील यांनी केली.

आयोगानुसार वेतन शक्य नाही
परिवहनकामगारांना सहावे वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, अशी मागणी संघटनेची आहे. पण ते तूर्त शक्य नाही, असा पुनरुच्चार महापालिका आयुक्त काळम-पाटील यांनी केला.