आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुवर्णमंदिर’च्या कारागिरांकडून द्रविडी कलाकुसरीस झाली सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या गर्भ गृहाच्या बाह्य भिंतीवर लावण्यात आलेल्या बर्माटिक लाकडावर आता बारीक कलाकुसर करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अमृतसर गोल्डन टेंपलच्या पुनर्निर्माण करतेवेळी काम केलेले कारागीरच हे काम करीत आहेत.
मागील वर्षभरापासून सुवर्ण सिद्धेश्वरच्या निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात मंदिराच्या अंतर्भाग, बाह्यभाग तलावाचा काठ आदी भागात एलईडी लाइटिंग, मंदिरात विशिष्ट प्रकारची दिवाबत्ती, गुप्त दान पेटी, भाविकांच्या सोयीसाठी यात्री निवास, रात्रीच्यावेळी मंदिर परिसर नीट पाहता यावा यासाठी यात्रीनिवासाच्याजवळ नवा पोर्च, स्वच्छतेसाठी सफाई मशिन आदी कामे करण्यात आली आहेत. तसेच जानेवारी महिन्यात दोन जून महिन्यात दोन असे एकूण चार चांदीचे खांबही लावण्यात आले आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून आता मंदिराच्या मूळ ढाच्याला इजा होता ही जातीवंत लाकडावर कलाकुसर करण्यात येत आहे.
^यापूर्वी आम्हीदिल्ली, पंजाब, पुणे आदींसह देशातील अन्य राज्यातील मोठमोठी दालने, मंदिरे यांचे काम केले आहे. हा अामचा परंपरागत व्यवसाय असून विशेष आम्ही अमृतसर सुवर्ण मंदिराचेही काम केले आहे. जवळपास दीड महिन्यात हे काम पूर्ण होईल.'' योगेंद्रकुसवाहा, कारागीर

असे होत आहे काम
१२५ घनफूट म्हणजे अंदाजे हजार ५०० किलो बर्माटिक लाकडावर हे काम होत आहे. या लाकडाची रुंदी ते २० इंच, जाडी दीड इंच लांबी साधारण साडेअकरा ते १३ फूट आहे. या लाकडाच्या फळ्या करून त्या पुरातन मंदिराच्या भिंतीवर लावण्यात आल्या आहेत. आता यावर बारीक असे कोरीवकाम होत आहे. यासाठी उत्तरप्रदेशच्या खुशी नगर येथील योगेंद्र कुसवाहा पाली राजस्थानचे ईश्वरसिंह पवार मुख्य काम करीत आहेत. प्रथमत: मंदिराच्या भिंतीच्या आकारानुसार फळ्या कापून त्यावर टेन्सिल कार्बन कागदाच्या सहाय्याने चित्रे छापून ते काेरण्यात येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...