आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुवर्ण सिद्धेश्वर’चा श्रीगणेशा, दोन खांबांचे झाले पूजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सिद्धेश्वर मंदिरात चांदीच्या पत्र्याचे खांब पूजनानंतर दगडी खांबांना मढवण्यात आले. त्यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, प्रशांत हब्बू, बसवराज शास्त्री, गुंडप्पा कारभारी, मल्लिनाथ जोडभावी आदी.
सोलापूर - कलाकुसर असलेले चांदीच्या पत्र्याचे खांब गर्भगृहाच्या बाह्य भागातील दगडी खांबांना मढवून सुवर्ण सिद्धेश्वर मंदिराच्या संकल्पनेला मूर्तरूप देणे सुरू झाले. सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम झाला. होटगी मठाचे अधिपती तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे पाच फूट उंच आणि प्रत्येकी ३५ किलो वजन खांबांचे आहे.
हब्बू मंडळी पुरोहितांतर्फे खांबांची पूजा झाली. योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी सोलापूरचा नावलौकिक वाढवणारा हा प्रकल्प असल्याचे सांगून भक्तांकडून मिळत असलेल्या देणग्यांबद्दल आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, पुजारी प्रशांत हब्बू, आनंद हब्बू, शिवकुमार हब्बू, शुभम हब्बू, बसवराज शास्त्री, हिरेमठ, गुंडप्पा कारभारी, रामकृष्ण नष्टे, गौरीशंकर डुमणे, मल्लिनाथ जोडभावी पंचकमिटी पदाधिकारी आदी उपस्थित होते.

वर्षातच सुरुवात, ही आनंदाची बाब
देवस्थानसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी "दिव्य मराठी'ने मांडलेली ही संकल्पना आवडली. वर्ष पूर्ण व्हायच्या आत यास सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच पुढील टप्प्यातील कामासाठी अजून देणगी देण्याचे आवाहनही केले.