आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या ७५ प्रकरणांतील मुद्देमाल तक्रारदारांच्या हवाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिस आयुक्तालयाने मंगळवारी चोरीच्या ७५ प्रकरणांत हस्तगत केलेला मुद्देमाल तक्रादारांच्या हवाली केला. यामध्ये सुमारे पंधरा लाखांचे दागिने, अडीच लाख रुपये किमतीचे मोबाइल संच, २२ वाहनांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयुक्तालयात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्यात ७० नागरिक उपस्थित होते. त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेतला तर उर्वरित काहींनी बुधवारी घेतला.
एकूण ७५ प्रकरणांतील दोन खटल्यांचा निकाल लागला असून उर्वरित ७३ प्रकरणांत न्यायालयात खटला सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरीच्या घटना गेल्या पाच वर्षांतील आहेत. यातील ३६ तक्रारदारांना एकूण १५ लाख २६ हजार २४० रुपयांचे दागिने, २७ जणांना दोन लाख ६२ हजार रुपयांचे मोबाइल संच तर २२ जणांना त्यांची वाहने ताब्यात देण्यात आली. घरफोडी, मंगळसूत्र हिसकावणे, वाहन चोरीला जाणे अशा प्रकरणातील हा मुद्देमाल होता. पोलिसांनी गुन्हे उघडकीला आणून चोरांना जेरबंद केले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पोलिस उपायुक्त बालसिंग रजपूत, सहाय्यक आयुक्त शर्मिष्ठा घारगे- वालावलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिस ठाणे दागिने किंमत मोबाइल संच किंमत वाहने
जेलरोड २४ हजार (१) लाख हजार (१०)
एमआयडीसी ६६ हजार (२)
सदर बझार लाख ४१ हजार ७५० (६) ४६ हजार (५)
जोडभावी पेठ २३ हजार (४) १० हजार (१)
फौजदार चावडी ७१ हजार ५०० (५) ४० हजार (५)
विजापूर नाका १० लाख ९९ हजार ९९० (१७) ६० हजार (६)
सलगरवस्ती मंगळसूत्र चोरी (१)

पोलिस आयुक्त सेनगावकरांकडून खंत समाधान
पोलिसांनी मनावर घेतले तर मंदिरसमोरची चप्पल चोरीला जात नाही, हा फिल्मी डॉयलॉग बरोबर आहे. काही अधिकारी ‘हे माझे काम नाही’ असे सांगून टाळाटाळ करतात, अशा शब्दांत पोलिस आयुक्त सेनगांवकर यांनी चोऱ्यांविषयी खंत व्यक्त केली. गुन्हे उघडकीला आणलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. चोरीच्या प्रवृत्तीविषयी ते म्हणाले की, योग्य संस्कार करण्यात आले नाही की मुले वाममार्गाकडे वळतात. याला आई-वडील, मित्र मंडळी, समाज जबाबदार आहे. त्यासाठी शिक्षणाचा प्रसार तसेच नीतीमत्ता वाढवणे गरजेचे.

परत मिळेल अशी आशा नव्हती
^आमचे दागिने चोरीला गेल्यानंतर ते परत मिळतील अशी आशा नव्हती. मात्र पोलिसांनी चोरीला गेलेले अनेकांचे दागिने मिळवले. त्यामुळे खूप समाधान वाटले. पोलिसांच्या कामगिरीवर अभिमान वाटतो.” गीता पाटोळे, तक्रादार नागरिक

फिर्यादींना मुद्देमाल दिला
^फिर्यादींना बोलावून त्यांचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात दिला. कार्यक्रमाप्रसंगी चार-पाचजण आले नव्हते. त्यांनी २७ जानेवारी रोजी आपला मुद्देमाल घेतला. एकूण ७५ जणांना त्यांचा मुद्देमाल देण्यात आला.” शंकर जिरगे, पोलिस निरीक्षक