आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS - सोनाली, अमृता, सिमरन यांच्या तालावर सोलापूरकर थिरकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया - रामदास काटकर
सोलापूर - सोरेगाव येथीस एसआरपी कॅम्पचे मैदान उत्साह आणि आनंदी वातावरणाने बहरले होते. विद्युत दवि्यांचा झोत, हवेतील गारवा, संगीत-नृत्याचा अनोखा संगम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, सिमरन कौर या तिघींनी बहारदार नृत्यांचा नजराणा पेश करत अक्षरश: सोलापूरकरांना आपल्या तालावर नाचवले. सर्वात उत्साही रॉकस्टार पल्लवी दाभोळकर हीने मात्र सर्वांना थिरकायला लावले. निमित्त होते, शहर पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजिलेल्या स्वरतरंग कार्यक्रमाचे.

पोलिस वेल फेअर फंडासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली होती. ‘अप्सरा आली’ या चित्रपट गीतावर सोनालीने सर्वांना घायाळ केले. यानंतर रॉकस्टार पल्लवीने ‘गलिया मेरी गलिया..’ ‘हर किसी को नहीं मिलता यहँ प्यार जिंदगी में..’ या गाण्यावर अक्षरश: डोलवले. यानंतर पंजाबचीकुडी सिमरन कौर हीने ‘प्यार चाहे लिला चाहे..’ गाण्यांवर अफलातून नृत्य सादर करीत सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या. ‘नटरंग फेम’ अमृता हिने ‘मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...’ या लावणी नृत्यावर दिलखेच अदाकारीने उपस्थितांना ठेका धरायला लावला.

त्यानंतर सिमरने ‘होटो में एैसी बात..’ सोनालिने ‘ही पोरगी साजूक तुपातली..’ अमृताने ‘चिकणी चमेली’ या गाण्यांवर नृत्य सादरीकरणाद्वारे कार्यक्रमाची रंगत वाढवली. अतुल तोडणकर, आशिष पवार या विनोदवीर कलावंतांनी चित्रपटातील कथानक सागंत उपस्थितांमध्ये हास्यलाटा निर्माण केल्या. स्थानिक कलावंत जयंत पानसरे, मोहम्मद अयाज यांनीही चित्रपटातील गाणी सादर केली.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी स्वागत केले.

कोसंबी अन् चार्मिंग
तरुणींचाआवडता गायक अभिजित कोसंबी याने ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी..’ हे गाणे सादर करीत तरुणाईच्या मनावर मोरपीस फिरवले. त्यानंतर संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने ‘मोरया मोरया...’ गाण्याद्वारे कार्यक्रमात भक्तीचा मळा फुलवला. गायक आशरफ यांनी ‘क्या हुआ तेरा वादा...’ या गाण्याद्वारे मोन्स मोअर मिळवला. ’शोधीशी मानवा..’ या भावगीताद्वारे सर्वांना अंर्तमुख केले.
स्वरतरंग कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, पोलिस आयुक्त सेनगावकर.

अन् अमृता भारावली...
अमृताही नृत्य सादर करीत असताना अचानक तिच्या पायामध्ये व्यासपीठावर खिळा रुतला. गाणे थांबवून मध्येच ती बाहेर गेली. आणि काही वेळाने पुन्हा नृत्य सादर केले. यापूर्वी नृत्यकरीत असताना माझ्या पायात खिळा रुतल्याने मी बाहेर गेले. या बद्दल मी सर्वांची माफी मागते, असे सांगताच सोलापूरकरांनी तिच्या जिद्दीला उभे राहून टाळ्यांची कडकडाट करीत प्रोत्साहन दिले. सोलापूरकरांच्या प्रेमाने ती भारावली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटाेज़....

बातम्या आणखी आहेत...