आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरण बंदचा विषय, प्रशासनाने झटकले हात दोन तलाव बंद ठेवल्यास दररोजचे २२ हजार लिटर पाणी वाचणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उन्हाळ्यात जलतरण शिकवण्यासाठी पालकांचा ओढ असतो. यंदा दुष्काळी परिस्थिती पाहता, जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरातील दोन जलतरण तलाव बंद ठेवण्याबाबत सभागृहात निर्णय व्हावा म्हणून महापालिका आयुक्तांनी सभागृहाकडे विषय पाठवला. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे उन्हाळी शिबिर घ्यायची की नाही याबाबत प्रशासन पातळीवर निर्णय होऊ शकला नाही.
महापालिकेचे जलतरण तलाव चार पुतळा मागे आणि अशोक चौक येथे आहेत. पाणीटंचाईमुळे ते बंद ठेवण्याचे निर्देश शासनाचे आहेत. महापालिका पातळीवर निर्णय घेणे आवश्यक असल्याने मनपा क्रीडा विभागाने आयुक्तांकडे प्रस्ताव दिला. आयुक्तांनी सभागृहाकडे तातडीचा प्रस्ताव २० एप्रिल रोजी दाखल केला. त्यावर निर्णय प्रलंबित आहे.

रोज २२ हजार लिटर पाणी
महापालिकेचे दाेन्ही जलतरण तलाव असून, अशोक चौकातील मार्कंडेय जलतरण तलावास दोन दिवसांआड ५० हजार लिटर, तर स्व. सावरकर जलतरण तलावास तीन दिवसांआड २० हजार लिटर असे रोज सरासरी २२ हजार लिटर पिण्याचे पाणी लागते. तलाव बंद ठेवल्यास हे पाणी वाचणार आहे. महापालिका सभागृहात अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे.

सभागृहात प्रस्ताव
^मनपाच्या दोन्ही जलतरण तलावांबाबत शासनाच्या सूचनेनुसार सभागृहात प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर निर्णय व्हायचा आहे. जलतरण तलाव चालू आहेत पण उन्हाळी शिबिरे बंद आहेत. नजीर शेख, मनपाक्रीडा अधिकारी