आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तडप' चित्रपटाचा प्रीमियर शो 16 ऑगस्टला, डॉ. सतीश वळसंगकर यांची आहे निर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरच्या कलाकारांनी सामाजिक बांधिलकी म्हणून तयार केलेल्या तडप या चित्रपटाचा प्रीमियर शो रविवारी (१६ आॅगस्ट) सोलापुरात होत आहे. लहानांपासून ते शिक्षणतज्ज्ञांपर्यंत सर्वांनी पाहावा असा हा चित्रपट असल्याचे निर्माते डॉ. सतीश वळसंगकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रभात चित्रपटगृहात रविवारी सकाळी वाजता शुभारंभाचा प्रयोग आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रकाश यलगुलवार, हारून करकम, राज निली, सुमित फुलमामडी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
यांच्या आहेत भूमिका : मिलिंद पटवर्धन, अपर्णा जोशी, सुमित फुलमामडी, गीतांजली देशमुख, मास्टर सय्यद सफदरअली, अशोक किल्लेदार, अनुपमा खेड, किरण फडके, अस्लम अरब, अ. हमीद बलूलखान, जगदीश हलकुडे, तौफिक चौधरी, राज निली निर्माते : डॉ. वळसंगकर, निर्देशन, पटकथा संवाद : राज निली, लेखक गीतकार - हारुम करकम, छायांकन : एजाज शेख, संगीत दिग्दर्शन गायक : मोहंमद अयाज, संगीत संयोजन : जब्बार धनंजय, पार्श्वसंगीत मंदार निली, कला निर्देशन : सुमित फुलमामडी, संकलन : दिनेश म्याना
अशी आहे चित्रपटाची कथा
दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम यांना आदर्श मानून झोपडपट्टीतील एक मुलग कठीण परिस्थितीशी झुंज देतो. आपली जिद्द, तडप चालू ठेवतो. त्या मुलाला त्याच्या आईने समजावलेले असते की, "केवळ शिक्षणाच्या जोरावर डाॅ. कलाम हे राष्ट्रपती बनले. जात, पंथ, गरिबी काहीही अडथळा आणू शकली नाही.'

मोहम्मद अय्याज शेख यांचे पार्श्वसंगीत आणि गायनही
संगीताला गुरू मानून चंदेरी दुनियेत काम करण्यासाठी बाहेर पडलेल्या कष्टाळू मोहम्मद अयाज शेख या युवा गायकाने सोलापुरात तयार झालेल्या तडप या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. आजवर गायक म्हणून ओळख असलेला अयाज हा आता संगीतकाराच्या भूमिकेत पुढे येणार आहे. या संगीतातून देशाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, याचे समाधान वाटले, अशी भावना संगीत दिग्दर्शक मोहम्मद अयाज यांनी व्यक्त केली.
शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न
- नुकतेच निवर्तलेले माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम यांना आदर्श मानून स्वत:च्या उन्नतीसह आपल्या मित्रांची प्रगती करणारा विद्यार्थी या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून शिक्षणाचे महत्त्व आणि जात, धर्म यापेक्षा मानवता धर्मच श्रेष्ठ असल्याचे आम्हाला सुचवायचे आहे.
डॉ. सतीश वळसंगकर, निर्माते