आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकळी सिकंदर येथे चोर समजून एकास मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ (सोलापूर) - टाकळी सिकंदर येथे शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चोर समजून एकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. त्या तो गंभीर जखमी झाला आहे. समरत मांझी (वय ४५) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जखमीकडील पिशवीत गहू, नारळ प्रसादाचे साहित्य आढळले. घटनेनंतर त्याला घेऊन निघालेल्या पोलिस वाहनावरही जमावातील काहीनी दगडफेक केली. मात्र, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झाला नव्हता. तसेच तो नेमका कुठला आहे, हे कळू शकले नाही. सायंकाळी एकाचा संशय आल्याने जमावाने अनोळखी इसमाला मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी सुमारे दीड ते दोन हजाराचा जमाव जमला होता. गावातीलच काही मंडळींनी मारहाण थांबवावयास लावून त्या इसमाला एका पत्र्याच्या शेडमध्ये हलवले आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस निरीक्षक सूरज बंडगर त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जमावाची आक्रमकता पाहून पोलिस निरीक्षक बंडगर यांनी नियंत्रण कक्षाला कळवून जादा कुमक मागवली. तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बंदोबस्तात जखमीला वाहनात घेऊन पोलिस निघाले त्यावेळी काहीनी त्यावरही दगडफेक केली. त्यात गाडीचे नुकसान झाले. पोलिसांनी जखमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले.