आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वेळेत केल्यास कारवाई - पर्यावरण मंत्र्यांचा आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुणे,पिंपरी चिंचवड महापालिकांसह पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने उभारावेत. सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीपात्रात सोडावेत. अन्यथा संबंधितांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल, असे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.

नमामि चंद्रभागा अभियान सांडपाणी प्रक्रियेबाबतच्या कामांचा आढावा पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी पुणे येथील विधानमंडळाच्या कार्यालयात घेतला. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव पी. के. मिरासे, पुणे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके, पुणे पिंपरी चिंचवड महापालिकांचे अधिकारी, सोलापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी उपसंचालक नवनाथ अवताडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, की महापालिका नगरपालिकांनी उर्वरितपान १०
त्यांच्याएकूण अर्थसंकल्पातील २५ टक्के तरतूद सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी राखीव ठेवावी. त्या कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्थांनी ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये तो प्रकल्प सुरू करावा. भीमा नदीत मिसळत असलेल्या सांडपाण्यामुळे जैवविविधतेला धोका वाढत आहे. चंद्रभागेचे पावित्र्य जपण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या सांडपाणी प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापनाचे सादरीकरण केले.
बातम्या आणखी आहेत...