आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा, उजनीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भीमेच्या प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढतोय. नदीचे आरोग्य तर बिघडलेच आहे. लाखो सोलापूरकरांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतोय. प्रदूषण करणाऱ्या घटकांची तातडीने चौकशी करा आणि भीमा, उजनीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्या, अशी मागणी आमदार प्रणिती िशंदे, आमदार बबनराव शिंदे, आमदार भारत भालके यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे. गेले आठ दिवस "दिव्य मराठी' वृत्तमालिकेच्या माध्यमातून भीमा खोऱ्यातील प्रदूषणाचे वास्तव मांडत आहे. उर्वरितपान १२
यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विधिमंडळ अधिवेशनात शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला लावू, असे आश्वासन दिले होते. आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी प्रधान सचिवांना यासंदर्भात लक्षवेधी सूचनेचे पत्र दिले. आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे यांच्या या पत्रावर सह्या आहेत.

प्रदूषण वाढल्याचा अहवाल
शिंदेयांनी पत्रात म्हटले आहे की, जुलै महिन्यात केंद्रीय मंडळाने टाकळी, जेवरगी, गाणगापूर येथील पाण्यांच्या नमुन्यांची तपासणी केली होती. त्यात भीमेच्या प्रदूषणाचा स्तर वाढल्याचे निदर्शनाला आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, येथील एमआयडीसी, साखर कारखान्यांचे सांडपाणी भीमा नदीत मिसळत आहे. उजनीतील अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भीमा नदी उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्याचे सिंचन आणि ८० टक्के पाणी पुरवठा अवलंबून आहे.
बातम्या आणखी आहेत...