आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तळेहिप्परगा अपघाताचा थरार सीसीटीव्हीत; गुमडेल, अासबे, माळगे यांना काॅलेजात श्रद्धांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अाॅर्किड महाविद्यालयात शिकणारे दीपक गुमडेल, अक्षय अासबे, संगमेश माळगे या तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी काॅलेजात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात अाली. यावेळी विद्यार्थी प्राध्यापक यांच्या चेह-यावर दु:खाची छाया दिसली. त्यांचे येणे- जाणे, वागणे, अभ्यास करणे, उपस्थिती याबद्दलच सगळेच अाठवणी सांगत होते. 


सोमवारी दुपारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने काॅलेजात संवाद साधला. त्यावेळी हा प्रसंग एेकायला पाहायला मिळाला. अपघात स्थळाची अाज पुन्हा पाहणी केली असता त्याच जागी पहाटे ट्रक उलटला अाहे. चालक क्लीनर गंभीर जखमी अाहेत. प्राची हाॅटेलच्या सीसीटीव्हीत अपघाताची घटना कैद झाली असून अंधारामुळे पुसट चित्रीकरण अाहे. 

 

काॅलेजात दु:खाचे सावट 
प्राचार्य जे. बी. दफेदार श्रद्धांजली वाहताना म्हणाले, अामच्यावर दु:खाचा प्रसंग अाहे. मुुलांच्या जाण्याने कुटुंबाचा अाधार गेलाय. घरी ये-जा करताना वाहतूक िनयम पाळा. वाहने सावकाश चालवा अशा सूचना दिल्या. अधिष्ठाता प्रशासन विभागाचे प्रमुख जे. बी. नाडे म्हणाले, सोलापूर विद्यापीठाकडून अपघाती विमा कवच योजनेसाठी तीनही विद्यार्थ्यांची फाईल तयार करून सादर करणार अाहे. डाॅ. बी. एस. सोनगे, प्रा. अाय. अाय. मुजावर, रजिस्टार सुहास शेळके यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. अावारात दु:खाचे सावट होते. 


पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न होते
तिघेही माझे जवळचे मित्र होते. वर्गात अभ्यासात एकत्रित बसायचो. दीपक, अक्षय संगमेश म्हणायचे पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न अाहे म्हणून. नाहीतर अभियांत्रिकी विभागात संशोधक होण्याचे. लायब्ररीत पहाटेपर्यंत अभ्यास, नेहमी अपडेट राहत असत, या अाठवणी हणमंत बिराजदार या मित्राने जागविल्या. 


अाजहीत्याच जागी अपघात
प्राचीहाॅटेल ते मराठवाडा अौद्योगिक प्रशिक्षण केंद्र या दरम्यान तिघांचा जीव गेला. अाज पुन्हा त्याच ठिकाणी राजस्थानहून केरळकडे जाणारा ट्रक उलटला अाहे. पहाटे चारला अपघात झाला. चालक क्लिनरवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. नियमित या ठिकाणी अपघात होतात. काहीतरी उपाययोजना होणे गरजेचे अाहे असे शशी शिंदे यांनी सांगितले. अलीकडील काळात सुमारे दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात अाले.

 
कंटेनर चालकाचा शोध सुरू अाहे
प्राची हाॅटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टता नाही. तरीही त्याचा अाधार घेऊ. मशरूम गणपती मंदिराजवळ काही कॅमेरे अाहेत. त्यात काही माहिती मिळते का पाहूयात. अन्यथा हैदराबाद, पुणे, विजापूर या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यास अपघाताची वेळ अन्य वाहनांची ये-जा याची ताळमेळ घालून चालकाचा शोध लावू, असे सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंंदे यांनी सांगितले. 


पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न होते 
तिघेही माझे जवळचे मित्र होते. वर्गात अभ्यासात एकत्रीत बसायचो. दीपक, अक्षय संगमेश म्हणायचे पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न अाहे म्हणून. नाहीतर अभियांत्रीकी विभागात संशोधक होण्याचे. लायब्ररीत पहाटेपर्यंत अभ्यास, नेहमी अपडेट राहत असत या अाठवणी हणमंत बिराजदार या मित्राने जागविल्या. 


अाॅर्किड महाविद्यालयात शिकणारे दीपक गुमडेल, अक्षय अासबे, संगमेश माळगे या तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी काॅलेजात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात अाली. यावेळी विद्यार्थी प्राध्यापक यांच्या चेह-यावर दु:खाची छाया दिसली. त्यांचे येणे- जाणे, वागणे, अभ्यास करणे, उपस्थिती याबद्दलच सगळेच अाठवणी सांगत होते. प्राची हाॅटेल ते मराठवाडा अौदयोगीक प्रशिक्षण केंद्र या दरम्यान तिघांचा जीव गेला. अाज पुन्हा त्याच ठिकाणी राजस्थानहून केरळकडे जाणारा ट्रक उलटला अाहे. पहाटे चारला अपघात झाला. चालक क्लिनरवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू अाहेत. नियमीत या ठिकाणी अपघात होतात. काहीतरी उपाययोजना होणे गरजेचे अाहे असे शशी शिंदे यांनी सांगीतले. अलिकडील काळात सुमारे दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात अाले. 


कंटनेरचालकाचा शोध सुरू अाहे 
प्राची हाॅटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टता नाही. तरीही त्याचा अाधार घेऊ. मशरूम गणपती मंदिराजवळ काही कॅमेरे अाहेत. त्यात काही माहिती मिळते का पाहूयात. अन्यथा हैदराबाद, पुणे, विजापूर या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यास अपघाताची वेळ अन्य वाहनांची ये-जा याची ताळमेळ घालून चालकाचा शोध लावू असे सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंंदे यांनी सांगितले. 


दीड वर्षापासून रस्त्याचे काम.... 
- अपघात झालेलीवेळ पहाटे तीन वाजून एक मिनीट १२ सेकंदाची 
- वाहनाची धडक बसल्यानंतर दुचाकी फरफटत गेली. 
- चाकाखाली प्रकाश चमकत होता. 
- दीड वर्षापासून रस्त्याचे काम सुरूच अाहे 
- रस्त्यावर दुभाजकात अनेक ठिकाणी अनावश्यक गॅप सोडण्यात अाले अाहे 
- वाहतूक पोलिसांकडून उपाययोजनांची गरज 
- बांधकाम विभागाकडून सूचना फलक, गतिरोधकाची सोय, अथवा सर्व्हिस रस्त्याची सोय करण्याची मागणी 

बातम्या आणखी आहेत...