आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठी संघटनेने उगारले बेमुदत संपाचे हत्यार, ऑनलाइन सात‑बारा, त्रुटी दूर करण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आॅनलाइन सात-बारा उतारा फेरफार अंमलबजावणीतून त्रुटी दूर कराव्यात या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील तलाठी मंडलाधिकारी यांनी अखेर बेमुदत आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. ऑनलाइन कामावरच बहिष्कार टाकत डेटा कार्ड तहसीलदार यांच्याकडे जमा केले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे तलाठी संघटनेचे अब्दुल रजाक मकानदार यांनी सांगितले.

संघटनेने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून काम केले, १६ एप्रिल रोजी जेवणाच्या सुटीत निदर्शने तर २० एप्रिल रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केेले. याबाबत शासनाने कोणतीही भूमिका घेतल्याने २६ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला. यामध्ये ५०० तलाठी ९० मंडलाधिकारी यांचा सहभाग आहे. संपामुळे महसूलच्या कामकाजावर परिणाम दिसून आला.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन
३०एप्रिल२०१५ रोजी महसूलमंत्री यांच्याकडे आमच्या मागण्या मांडल्या होत्या. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले हाेते. मात्र त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. शिवाय ऑनलाइन उतारा अंमलबजावणीतील त्रुटींचा तलाठी मंडलाधिकारी यांना नाहक त्रास होत आहे. हा त्रास कमी व्हावा, ही मागणी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. अ. रजाक मकानदार, अध्यक्ष,तलाठी संघटना

टंचाईची कामे करणार
जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती आहे. संप सुरू असला तरी तलाठी मंडलाधिकारी यांच्याकडून टँकर टंचाईची कामे केली जाणार असल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे.

या आहेत मागण्या
तलाठी सजांची महसूल मंडळाची पुनर्रचना करावी, सात-बारा संगणकीकरण ई-फेरफारमधील अडचणी दूर कराव्यात, तलाठी, मंडलाधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावे, अवैध गौण खनिज कामातून तलाठी संवर्गास वगळावे, तलाठी कार्यालय बांधावे, पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धती अवलंबावी, अंशदायी निवृत्ती वेतन योजना राबवावी.