आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉलेस्ट टिनएजर ऑफ इंडिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वंडरबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या ब्रिटिश संस्थेने येथील उंचकुमार यशवंत राऊतला ‘टॉलेस्ट टिनएजर ऑफ इंडिया’या किताबाने गौरवले आहे. यशवंत १४ वर्षांचा असून सध्या तो फूट इंच उंच आहे. या आधी त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या कमी वयातील सर्वात उंच किताबाच्या चाचणी फेरीत यशस्वी सहभाग नोंदवला आहे. तो नववीचा विद्यार्थी आहे. ब्रिटिश संस्थेचे नवी दिल्ली येथे विभागीय कार्यालय आहे. विविध कला, गुण, नैपुण्य यात वेगळेपण असणाऱ्यांकडून ऑनलाइन माहिती मागवण्यात आली होती. कुमार वयोगट आणि अधिक उंची यात यशवंतचे कमी वय आणि त्याची सर्वाधिक उंची या जमेच्या बाजू ठरल्या. यूके शिल्ड, सुवर्ण पदक आणि प्रशस्तिपत्र देऊन त्यास गौरवण्यात आले.जानेवारी मध्ये गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नामांकनासाठी घेण्यात आलेली उंची आणि आताच्या सन्मानाची उंची यात एक इंचाने वाढ दिसून आली आहे.