आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा पाणी संस्थान खालसा करण्याची शासनाकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पश्चिम घाटातील टाटा पाणी संस्थान कायदेशीर पध्दतीने खालसा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र राज्य शासनाकडे केल्याची माहिती जल अभ्यासक प्रफुल्ल कदम यांनी पत्रपरिषदेत दिली.

स्वातंत्र्यपूर्व काळात टाटा पॉवर कंपनीने ब्रिटिश सरकारशी करार करून लोणावळा, वलवण, शिरवटा, ठोकरवाडी, सोमवडी, मुळशी ही सहा धरणे बांधली. या धरणातील पाण्याचा विनामोबदला वापर करून त्यांनी खोपोली, भिवपुरी भिरा येथे ४४५.५ मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभे केले. ही वीज मुंबईमधील ४.५ लाख ग्राहकांना विकली जात आहे. या वीजनिर्मितीसाठी भीमा नदीच्या खोऱ्यातील ४८.९७ टीएमसी पाणी खासगी जलविद्युत प्रकल्पासाठी वापरले जाते. गेली अनेक वर्षे ही आर्थिक नैसर्गिक लूट उघडपणे सुरू आहे. त्यामुळे टाटा पाणी संस्थान राज्य केंद्र सरकाने त्वरित खालसा पाणी प्रश्न मिटवावा, अशी मागणी कदम यांनी शासनाकडे केली आहे.

पाणीप्रश्न मिटणार ...
टाटापाणी संस्थान खालसा केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या ४०.७६ टीएमसी पाण्यातून प.महाराष्ट्र मराठवाड्यातील कोटी पेक्षा अधिक दुष्काळी भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यातून लाख एकर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होईल. शिवाय मराठवाड्यास द्यावे लागणाऱ्या २२ टीएमसी पाण्याचा प्रश्न यामुळे मिटेल, असा विश्वास श्री. कदम यांनी व्यक्त केला आहे.

हे निर्णय त्वरित घेण्याची मागणी...
टाटाकरारपत्राची वैधता योग्यता तपासणीसाठी कायदेतज्ज्ञांची अनुभवी प्रशासकाची समिती नेमावी, टाटा पाणी संस्थान खालसा करण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी अभ्यास गट नेमावा, संभाव्य ५०० मेगावॅट अपारंपारिक ऊर्जानिर्मितीच्या पर्यायी कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश द्यावेत, टाटा पाणी संस्थानमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन आराखडा बनविण्यासाठी पाणीपुरवठा जलसंपदा विभागाला आदेश द्यावेत, अवजल पाण्याचा लाभ होणा ऱ्या भागासाठी पर्यायी मार्ग सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाला आदेश द्यावेत, टाटा संस्थान खालसा करण्यासाठी या सर्व विषयाचे सनियंत्रण, समन्वय अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती समिती नेमावी.