आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या तरुणांच्या टाटा सुमोला अपघात, मुंबईत टिप्परने दिली धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शिवसेनेचा दसरा मेळावा आटोपून गावाकडे परतणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथील तरुणांच्या जीपला नवी मुंबईतील कळंबोलीजवळ टिप्परने पाठिमागून धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना शनिवारी (दि.३०) रात्री ११ ते साडेअकराच्या सुमारास घडली. यामध्ये जीपमधील सात जण जखमी एक गंभीर असल्याचे कळते. 
 
सचिन मते, पवन वाटवडे, संजय गोडसे, महादेव कोळसे, पंकज वाघमारे, समाधान जाधव, बालाजी मुळे (सर्व रा. चिखली ता. उस्मानाबाद) हे जीप क्र.एमएच २५ अार ३१९८ ने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला गेले होते. शनिवारी (दि.३०) सायंकाळी दसरा मेळाव्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन आटोपल्यानंतर हे तरुण टाटा सुमो जीपने गावाकडे जाण्यासाठी निघाले. त्यांची जीप रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कळंबोली येथे पोहचली असता भरधाव टिप्परने त्यांच्या जीपला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये जीप एका बाजुला उलटल्याचे कळते. 

यामध्ये पाठीमागे बसलेले सचिन मते, पवन वाटवडे, संजय गोडसे हे जखमी झाले तर इतरांना किरकोळ दुखापत झाल्याचे कळते. जखमींना तातडीने जवळच्याच एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते. दरम्यान, अपघाताची माहिती समजताच उस्मानाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अिनल खोचरे यांनी एमजीएम रुग्णालयात पोहचून अपघातातील तरुणांची भेट घेतली. तसेच डॉक्टरांचीही भेट घेऊन आवश्यक ते सर्व उपचार करण्याबाबत चर्चा केली. यावेळी किरकोळ जखमी दोघांना डिस्चार्जही देण्यात आल्याचे कळते. 
बातम्या आणखी आहेत...