आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवेरा-ट्रकचा भीषण अपघात, तिघे जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - भरधाव ट्रक व तवेरा जीपची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तवेरामधील एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि.६) रात्री वाजेच्या सुमारास बीड बायपास मार्गावर वरुडा रस्ता टी पाॅइंटजवळ घडला.

 

उस्मानाबादेतील राजाराम बलरात पाटील हे पत्नी ज्योती मुलगी राजनंदिनी यांच्यासह तवेरा जीपने सांजारोड येथून बायपास मार्गाने एमआयडीसीच्या दिशेने निघाले होते. वरुडा रोडजवळ महामार्गावर तुळजापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकशी (एचआर ७४ ४८२३) जारोची धडक बसली. यामध्ये तवेरामधील पाटील कुटुंबीय गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जीप रस्ता रुंदीकरणासाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात पडली. यावेळी जीपचे एक चाक जवळपास शंभर फूट लांब जाऊन पडले होते.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. दरम्यान, अपघातस्थळी रस्त्यालगतच रुंदीकरणासाठी मोठी चर खोदण्यात आलेली आहे. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी पट्टी, अथवा बोर्ड लावण्यात आलेला नसून केवळ औपचारिकता म्हणून थोड्या-थोड्या अंतरावर पोते बॅरीकेटस ठेवण्यात आले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...