आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात उपचाराच्या बहाण्याने शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ शिक्षकाने उपचाराच्या बहाण्याने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
 
आरोपी रमेश बगाडे हा नातेपुते येथील पळसमंडळ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर उपचार करण्याच्या बहाण्याने अत्याचार करीत असल्याचे उघड झाले आहे. उपचाराच्या बहाण्याने तो दररोज या मुलीला आपल्या घरी बोलावीत होता. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
 
आरोपी शिक्षक रमेश बगाडे पिरळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या कार्यरत असून त्याची नुकतीच पळसमंडळ येथून बदली झाली आहे. 2 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे बगाडे उपचारासाठी म्हणून पीडित विद्यार्थीनीस पळसमंडळ येथील शाळेतून नातेपुते येथील आपल्या घरी घेऊन आला आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर मुलगी शाळेत जावून रडू लागली. शाळेतील शिक्षकांनी विचारणा केली असता पीडितेने मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला. मुख्याध्यापकांनी तात्काळ घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना दिली. त्यांनी नातेपुते पोलिस ठाण्यात धाव घेत नराधम शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. नातेपुते पोलिसांनी आरोपी शिक्षकावर भारतीय दंड विधान 376 आणि बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...