आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

साेलापूर- अहिल्याबाई प्रशालेच्या शिक्षकाने मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गुन्हा सोलापूर पोलिसांत नोंदवण्यात आला आहे.  


शंभुलिंग गुरप्पा वाले  असे आरोपीचे नाव आहे. शाळेतील वरच्या मजल्यावर रिकाम्या वर्गात तो विद्यार्थिनीला बोलावून घ्यायचा व त्यांना मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ दाखवयाचा. दरम्यान, मुलीच्या अंगाला स्पर्श करत करण्याचा प्रयत्न करत तिच्याकडे व्हिडिओप्रमाणे कृत्य करण्याची मागणी करायचा. पीडित विद्यार्थिनीने या प्रकाराबाबत पालकांना माहिती दिली. यावर पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापनाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...