आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : पत्नी, सासूला शिक्षकाने ठेचले दगडाने; नंतर केला केला नाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्‍थळी पडलेले दोघींचे मृतदेह - Divya Marathi
घटनास्‍थळी पडलेले दोघींचे मृतदेह

सोलापूर – शिक्षकाच्याा नोकरीत कायम होण्यासाठी सासू आणि पत्नीकडे २० लाख रुपयांची मागणी करीत शिक्षक पतीने पत्नी आणि सासूचा दगडाने ठेचून खून केला. खुनानंतर तो घटनास्थळीच कपडे काढून नाचू लागला. संतप्त जमावाने दगड मारून पकडून ठेवले. हा प्रकार होटगी रस्त्यावरील हत्तुरे वस्तीत काल (मंगळवारी) रात्री ८.४५ च्या सुमाराला घडला. विजापूर नाका पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
श्रीदेवी विठ्ठल शेवगार (वय ५०), संगीता सिद्धलिंग कामाने (वय २६, दोघे रा. हत्तुरेवस्ती, सोलापूर) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत. सिद्धलिंग पंडित कामाने (वय ३०, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
पुढील स्लाुइडवर वाचा 15 मिनिटांचा थरार...