आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीला अश्लील चित्रफित दाखवली, शिक्षकावर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एका शाळेतील शिक्षकाने आपल्या मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. शंभुलिंग गुरप्पा वाले (रा. सोलापूर) असे विनयभंग करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून तो आदर्श नगर परिसरातील अहिल्याबाई प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय येथे सहशिक्षक आहे.

 

याची माहिती अशी की, शाळेतील वरच्या मजल्यावर रिकाम्या असलेल्या वर्गात तो विद्यार्थिनीला, शाळेचे काम आहे म्हणून बोलावून घेत होता. तिथे विद्यार्थिनी आल्यावर तो, त्याच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ त्या विद्यार्थिनीला दाखवत होता.


व्हिडिओ दाखवल्यानंतर वाले हा त्या मुलीच्या अंगाला स्पर्श करत करण्याचा प्रयत्न करत आणि तिच्याकडे मोबाइलमधील व्हिडिओ प्रमाणे करू, अशी मागणी करत असे. दरम्यान पीडित विद्यार्थिनीने या घाणेरड्या प्रकाराबाबत पालकांना माहिती दिली. यावर पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार केली.

 

या तक्रारीची गंभीर दखल घेत, शाळा व्यवस्थापनाने चौकशी करीत प्राचार्य बद्रुनिस्सा होटगी यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास दुय्यम पोलिस निरीक्षक पाटील करीत असून संशयित आरोपीस अजून अटक झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...