आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निमशिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘टाळनाद’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - केवळ आश्वासनांच्याच ओझ्याखाली दबलेल्या निमशिक्षकांनी सेवेत पुन्हा सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आर्त विनवणी करत टाळनाद आंदोलन केले. श्रेय घेण्यासाठी ज्याच्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत दोन तास एकमेकांचा एकेरी उल्लेख करत चर्चा झाली होती, तेच पत्र सध्यातरी कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या सेवेतून वस्तीशाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या निमशिक्षकांना न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन पाच महिन्यांपूर्वी कमी करण्यात आले. मात्र, हा निर्णय कसा चुकीचा आहे, हे सिद्ध करूनही निमशिक्षकांना शाळेचे दार अद्यापही बंद ठेवण्यात आले आहे. अनेक आंदोलने करूनही अद्याप पदरात काहीच पडलेले नाही. यामुळे आता निमशिक्षकांनी शेवटची लढाई सुरू केली आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पुढाकार घेतला असून वारकऱ्यांसाखरा वेष परिधान करून निमशिक्षक समितीचे पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी महिला अपंग शिक्षकही आंदोलनात दाखल झाले.
शिक्षक समितीचे कल्याण बेताळे, बशिर तांबोळी, विलास कंटेकुरे, शिवाजी कवाळे, बाळासाहेब वाघमारे, मधुकर गायकवाड, रमेश बारसकर, लक्ष्मण वाघमोडे, सुनीता कराड, सविता पांढरे, बबिता मानूर, प्रवीण स्वामी, अरुण पाटील बळी आलमरे, नवनाथ गायकवाड, शरद सोनटक्के, सोमा निटूरे, सुधीर येणेगुरे, बी. के. साठे, बाबूराव कोकाटे, राजेंद्र गाडे, रामदास व्होरे, शेषेराव चव्हाण, लक्ष्मण बनसाेडे, महेंद्र रणदिवे, सतीश हुंडेकरी, अप्पाराव गोफने, हरिश्चंद्र होगले, रवींद्र सूर्यवंशी, सुनीता मस्कर, शुभदा कुलकर्णी, प्रदीप तांबे यांच्यासह निमशिक्षकांसह २५० जण सहभागी झाले होते.

सत्ताधारी, विरोधक पडले तोंडघशी
अवर सचिवांनी निमशिक्षकांच्या सामावून घेण्याबाबत एक पत्र पाठवले होते. या पत्रावरुन १४ सप्टेंबरच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच श्रेययुद्ध झाले होते. सत्ताधारी विरोधकांनी श्रेय घेण्याच्या चढाओढीत एकेरी भाषा वापरून सभागृहाची प्रतिष्ठा पायदळी तुडवली होती. ज्या पत्राचा इतका डंका वाजला ते पत्रही निमशिक्षकांना न्याय देऊ शकले नाही.

ठाकूरांचा शब्द कुचकामी
दि. ऑगस्टपासून नऊ दिवस निमशिक्षक उपोषण करत होते. १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन हादरुन गेले होते. त्यावेळी भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या माध्यमातून उपोषण तोडण्यात आले. त्यावेळी ठाकूर यांनी सेवेत सामावून घेण्याचा शब्द दिला होता. या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्यात आले.

यामुळे अडले घोडे
१२ वी अर्हता असणाऱ्या शिक्षकांना पदवीधरांच्या जागेवर बढती देण्याचा निर्णय रेंगाळल्यामुळे नियुक्त्या रखडल्या आहेत. या निर्णयाचा प्रश्नांचा संबंध नाही. जागा रिक्त नसल्याच्या मुद्द्यावरून शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.

पुढची पायरी आत्मदहन
आचार संहिता सुरू झाल्यावर निर्णय होणार नसल्याची भीती असल्यामुळे लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दि. जुलैपासून तीन दिवस नंतर दि. ऑगस्टपासून नऊ दिवस उपोषण करण्यात आले. त्यावेळी सात महिलांसह १० जणांना उपचार द्यावे लागले. दिवाळी झेडपीत साजरी करून आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...