आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदारपुत्राच्या संस्थेवर नाही कारवाई, आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - टेंभुर्णी ग्रामपंचायत सभागृह वापरासंदर्भात आमदारपुत्राविरोधात दिलेल्या तक्रारीवर जिल्हा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे बशीर जहागीरदार यांनी गुरुवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास रोगर प्राशन केले. पोलिसांनी तातडीने जहागीरदार यांना ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रोगर प्राशन करण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. आत्मदहनाचा इशारा देऊनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतल्याने जहागीरदार यांनी रोगर प्राशन केले. जहागीरदार यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
रीतसर मंजुरी घेतली
Ãविठ्ठलबाजारहे सहकारी ग्राहक भांडार आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार जिल्हा परिषदेकडून परवानगी घेऊन रीतसर मंजुरी दिली आहे. रणजितसिंह शिंदे, माजी उपसभापती

Ãजहागीरदार यांनी३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या अन्यथा आत्मदहन करणार असे निवेदन दिले होते. त्यानुसार १७ सप्टेंबर रोजी सीईओ यांना कारवाईसंबंधी पत्र दिले होते. जहागीरदार यांच्यावर लक्ष ठेवण्यासंबंधी टेंभुर्णी पोलिस ठाण्यासही कळवले होते. मात्र गुरुवारी जहागीरदार यांनी नजर चुकवून विष प्राशन केले. अजितरेळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे सभागृह २२ जुलै २००२ रोजी २९ वर्षांसाठी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना सर्व नियम डावलून देण्यात आले. २५०० चौरस मीटर बांधकाम केलेली जागा हजार रुपये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निवेदनात नमूद केले होते. यावर जि.प.ने २० सप्टेंबर २०१६ रोजी दुरुस्ती आदेश काढत करार वर्षांसाठी केला. मात्र त्यात करार कोणत्या वर्षांसाठी हे स्पष्टपणे नमूद नाही. या प्रकरणी जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार, वर्षभरातील दुसरी घटना
जहागीरदार यांनी १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात विठ्ठल बझारचा २९ वर्षांसाठीचा बेकायदा करार रद्द करण्यात यावा, सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.

यापूर्वीच्याअशा घटना
सुमित्रा पतसंस्थेचे सहायक व्यवस्थापक दिनकर भोसले यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी मुंढे यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली होती. न्याय मिळाल्याने त्यांनी रोगर प्राशन केले. त्यांचा मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाने नैराश्येपोटी तत्कालीन जिल्हाधिकारी गेडाम यांना आत्महत्या करत असल्याबाबत एसएमएस केला. त्यावर पोलिसांनी त्या मुलास ताब्यात घेतले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार, वर्षभरातील दुसरी घटना
जहागीरदार यांनी १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात िवठ्ठल बझारचा २९ वर्षांसाठीचा बेकायदा करार रद्द करण्यात यावा, सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.

यापूर्वीच्या अशा घटना
सुमित्रापत संस्थेचे सहायक व्यवस्थापक दिनकर भोसले यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी मुंढे यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली होती. न्याय मिळाल्याने त्यांनी रोगर प्राशन केले. त्यांचा मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाने नैराश्येपोटी तत्कालीन जिल्हाधिकारी गेडाम यांना आत्महत्या करत असल्याबाबत एसएमएस केला. त्यावर पोलिसांनी त्या मुलास ताब्यात घेतले होते.
बातम्या आणखी आहेत...