आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरांची माहिती आता अॅप्सवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येथील चार युवकांनी शहर-जिल्ह्यातील मंदिरांची माहिती देणारे अॅप्स तयार केले आहे. यात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर या मंदिराचा आधीच समावेश होता. आता त्यांनी अक्कलकोट येथील गौडगाव येथील प्रसिद्ध जागृत मारुतीचे अॅप संकेतस्थळ तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे मोफत उपलब्ध आहे.

येथील सनरजाईज कंपनीने हे अॅप बनविले असून यात जागृत मारुती मंदिर देवस्थानच नाही तर श्री मारुती स्तोत्र, हनुमंताची माहिती, जागृत मारुती माहिती, मंदिराची माहिती, मूर्तीची माहिती, इतिहास, प्रवासवर्णन, पुणे - मुंबई आदी ठिकाणांहून येथे कसे यायचे याचा गुगल मॅप आदी देण्यात आले आहे.

‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट जागृत मारुती डॉट ओआरजी’ या नावाने संकेतस्थळ सुरू केले आहे. यावरही विविध प्रकारची माहिती आहे. शहर-जिल्ह्यातील धार्मिकस्थळांची माहिती आणि इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. सोलापूरचे मार्केटिंगचा उद्देश आहे. गिरीशतंबाखे, सनरजाईज या अॅपवर मंदिरांची माहिती तर आहेच पण राम हनुमान भेट, संजीवनी आणणे आदी कथाही इंग्रजी भाषेत दिलेल्या आहेत.

गौडगावातील मारुती मंदिर जागृत असून दर्शनासाठी सोलापूर, पुणे, नगर भागांतून भाविक येतात. भाविकांच्या सुविधेसाठी अॅप सोयीचे ठरणार आहे. श्रीकांतखानापुरे, अध्यक्ष, गौडगाव मंदिर भारतीय संस्कृती, परंपरा, देवालये, गौडगावच्या श्री मारुतीची माहिती अॅपमध्ये आहे. विशेष म्हणजे अॅप पूर्णत: मोफत असून ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते.
विजय चिनगुंडे, श्रीकांती चिनगुंडे, गिरीश तंबाखे शक्ती निलंगे या चौघांनी या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप्स बनविण्यासाठी त्यांना जवळपास सहा महिने लागल्याचे ते सांगतात.
बातम्या आणखी आहेत...