आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलै महिन्यामध्ये दहा दिवस बँका बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुलै महिन्यात रमजान ईदची सार्वजनिक सुटी, दाेन शनिवार, पाच रविवार अन् दाेन दिवस संप, असे १० दिवस बँका बंद असतील. या कालावधीत ग्राहकांनी गैरसाेय होऊ नये यासाठी अापले अार्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करावेत. स्टेट बँक अाॅफ इंडियात काही बँकाचे विलिनीकरण हाेणार अाहे. त्याला विराेध करण्यासाठी कर्मचारी दाेन दिवस संपावर जाणार अाहेत. त्यानंतर एक दिवस देशव्यापी संप अाणि एक दिवस कर्मचारी संघटनांचा बंद अाहे. त्यामुळे तब्बल १२ दिवस बँका बंद असतील, असा संदेश साेशल मीडियावर येत अाहे. मात्र, प्रत्यक्षात १२ नाही तर १० दिवस बँका बंद असतील. कर्मचारी आणि अधिकारी संपावर असल्याने एटीएम केंद्रांत पुरेसे पैसे ठेवण्याबाबत विलंब होऊ शकतो. त्यामुळे एटीएम केंद्रे पैशाअभावी बंद असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढे वाचा...
बातम्या आणखी आहेत...