Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» The Backward Castes Will Be Excluded From Crimilere

मागास जाती ‘क्रिमिलेयर’मधून वगळणार, राज्याच्या मागासवर्गीय आयोगाने केली शिफारस

भटक्या विमुक्त, आेबीसी व एसबीसी प्रवर्गातील समूहांना ‘क्रिमिलेयर’च्या अटीतून वगळण्याची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने

प्रतिनिधी | Oct 11, 2017, 04:30 AM IST

  • मागास जाती ‘क्रिमिलेयर’मधून वगळणार, राज्याच्या मागासवर्गीय आयोगाने केली शिफारस
सोलापूर - भटक्या विमुक्त, आेबीसी व एसबीसी प्रवर्गातील समूहांना ‘क्रिमिलेयर’च्या अटीतून वगळण्याची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केली आहे. त्याचा अहवाल शासनाला दिला आहे. त्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत हरकती मागवल्या आहेत. प्रक्रिया पूर्ण झाल्यास या सर्व समूहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळवण्यात अडचणी येणार नाहीत.

पूर्वी नोकरी आणि व्यवसायातील एकूण उत्पन्न ६ लाखांच्यावर असू नये, अशी अट होती. ही मर्यादा ८ लाख करण्याचा निर्णय नुकताच झाला. परंतु ही अटच वगळण्याची मागणी सातत्याने झाली. ती मान्य करून शासनाने मागास आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एच. भाटिया यांची अभ्यास समिती २०१४ मध्ये नियुक्त केली. तिने सर्व जातघटकांचा अभ्यास करून हा अहवाल दिला. मागासवर्गात वंशपरंपरागत उद्योग, व्यवसाय करणाऱ्या जाती घोषित करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. आयाेगाकडूनच त्याचा अहवाल मागितला होता.

Next Article

Recommended