आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅम-1 परीक्षा आता ऑगस्टला होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेच्या द्वितीय वर्षातील थेअरी ऑफ मशिन्स- (टॅम) या विषयाची फेरपरीक्षा रविवारी (९ ऑगस्ट) रोजी सकाळी ११ ते या वेळेत घेण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारले गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्याने ही फेरपरीक्षा घेण्यात येत असल्याचे परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांनी सांगतिले.

१५ मे रोजी झालेल्या टॅम -१ च्या परीक्षेत १३०३ विद्यार्थी प्रवीष्ठ झाले होते. १०० गुणांच्या परीक्षेत ४० ते ४२ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील आहेत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. संभाजी आरमार एनएसयूआयने कुलगुरू एन. एन. मालदार यांच्याशी चर्चा केली. ४० गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी केली. सरसकट ४० गुण देण्याचा निर्णय स्वीकारता, फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाकडून तातडीच्या बैठकीद्वारे घेण्यात आला. यात सर्व सात विद्या शाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते. विविध संघटनांची निवेदने, विषय तज्ज्ञांचा आढावा, विद्यापीठाने यापूर्वी केलेली कार्यवाही याची नोंद घेतली व्यापक विद्यार्थीहित विचारात घेत फेर परीक्षेचा निर्णय घेतला.
पोलिसांना पाचारण केले
विद्यापीठात चर्चेसाठी गेलो असलो तरी विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. समाधानकारक चर्चा केली नाही. ऑगस्ट रोजी विद्यापीठासमोर आंदोलन करणार. श्रीकांत डांगे, संभाजी आरमार
४०गुण प्रदान करण्यात यावे
४०गुण प्रदान करण्यात यावे, अशी मागणी होती. फेरपरीक्षेच्या निर्णयाबाबत समाधानी नाही. मात्र आमदार प्रणिती शिंदे याांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येईल. गणेश डोंगरे, एनएसयूआय